पूर परिस्थितीचा आढावा घेत, जयंत पाटलांनी मुख्यमंत्र्यांवर केली खोचक टीका

शिंदे गटाचे व भाजपाचे युती सरकार स्थापन झाल्यानंतर राजकीय घडामोडीला वेग आला आहे.

पूर परिस्थितीचा आढावा घेत, जयंत पाटलांनी मुख्यमंत्र्यांवर केली खोचक टीका

मुंबई : शिंदे गटाचे व भाजपाचे युती सरकार स्थापन झाल्यानंतर राजकीय घडामोडीला वेग आला आहे. मात्र मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त अजून मिळालेला नाही. शिवसेनेचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी येत्या 19 किंवा 20 जुलै रोजी नव्या मंत्रिमंडळाची शपथविधी होईल अशी माहिती प्रसार माध्यमांना दिली होती. मात्र अधिकृतरित्या नव्या सरकारकडून याविषयी कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून राज्य सरकारवर टीका केली जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज नांदेडमध्ये पूरग्रस्त भागाचा आढावा घेतला. आणि या मुद्द्यावर राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. राज्याचे माजी जलसंपदा मंत्री राहिलेले जयंत पाटील यांनी आज नांदेडमध्ये दौरा केला. यावेळी नांदेड मधील पूर परिस्थितीचा त्यांनी आढावा घेतला. या परिसरात ढगफुटी झाल्याने नदीचे पाणी गावामध्ये शिरलेले आहे. आजूबाजूच्या गावांची परिस्थिती काही सुखाची नाहीय. या जोरदार पावसामुळे ऊस, सोयाबीन आणि इतर पिकांवर मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे प्रशासनाने या तत्काळ लक्ष घालून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा आणि घरात शिरलेल्या पाण्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा देखील करावा. अशी मागणी जयंत पाटील यांनी राज्य सरकारला केली आहे.

हेही वाचा : 

पंजाबी गायक दलेर मेहेंदीला दोन वर्षाचा तुरुंगवास, मानवी तस्करीचा आरोप

माध्यमांशी बोलताना जयंत पाटील म्हणाले, ” राज्यात पूर्व परिस्थितीने जनता संकटात आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री यांनी शपथ घेऊन 15 दिवस पूर्ण झाले त्यातही गुवाहाटीतली पंधरा दिवस आणि हा महिना उलटून गेला तरी सुद्धा मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. कोणाला कोणते मंत्रिपद द्यावे? यातच यांचा वेळ चाललेला आहे”. अशी खोचक टीका जयंत पाटलांनी राज्य सरकारवर केली.

इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली

Exit mobile version