Tuesday, July 2, 2024

Latest Posts

भर सभागृहात जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना लगावले टोले; शिवराजसिंह चौहान यांनी लाडकी बहीण योजना आणली अन् मुख्यमंत्रीपद गेलं, एकनाथ शिंदे ….

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी आज विधानसभेच्या भर सभागृहात सरकारवर जोरदार फटकेबाजी केली.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी आज विधानसभेच्या भर सभागृहात सरकारवर जोरदार फटकेबाजी केली. जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चांगलेच चिमटे काढले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करत असताना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची घोषणा केली. याच घोषणेवरुन जयंत पाटील यांनी टोले लगावले.

यावेळी सभागृहात बोलत असताना जयंत पाटील म्हणाले आहेत की, “आमच्या महाराष्ट्रातल्या बघिणींचा जसा घरावर, संपत्तीवर ५० टक्के वाटा आहे, अगदी वारसा हक्क लावताना सुद्धा बहिणीचं एनओसी नाही आली तर तिला तेवढा हक्क जातो. तसं या बजेटमध्ये बहि‍णींचा अधिकार आहे. यातील ५० टक्के बहि‍णींना त्यांचा वाटा देण्याची काळजी आपण घेतली पाहिजे. मागच्या काळात शिवराजसिंह चौहान यांनी लाडली बहीण योजना राबवली होती. त्या राज्यात ही योजना बरीच लोकप्रिय झाली. शिवराजसिंह चौहान यांना परत मुख्यमंत्री होता आलं नाही. एकनाथ शिंदे यांना हे माहिती आहे की नाही, ते मला माहिती नाही. त्यांनी स्वत: ती योजना मांडली नाही. त्यांनी मांडायला लावली अजित पवार यांना”, अशी टोलेबाजी जयंत पाटील यांनी केली.

 

“अजित दादांच्या मुखात तुकाराम महाराज आले. लोकसभेचा परिणाम दिसत आहे”, असा टोला जयंत पाटील यांनी सुरुवातीला लगावला. “राज्यात पाणी वाया चाललं आहे. पाणी बद्दल बोलायला नको? आपण मुख्यमंत्र्यांचं भाषण ऐकलं. इंद्रायणी आणि चंद्रभागा नदीची स्थिती वाईट झाली आहे. वारीचा आत्मा नद्या आहेत. यासाठी बजेटमध्ये काहीच केलं नाही. नद्यांच्या स्वच्छतासाठी घोषणा करावी”, अशी मागणी जयंत पाटील यांनी यावेळी केली. “अर्थमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण ही नवी योजना जाहीर केली आहे. या योजनेची अंमलबजावणी कशी होणार ते कळेलच. आता तुम्हीच सांगितलं की, महिलांची तहसील कार्यालय परिसरात गर्दी फार उसळलेली आहे. त्यामुळे त्या सगळ्या बहि‍णींना संपत्तीतला योग्य वाटा मिळायला हवा. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पातला ५० टक्के वाटा महिलांना मिळायला पाहिजे. आपल्या बघिणींचा तो अधिकार आहे. त्यामुळे तो वाटा दिला म्हणून काही बिघडत नाही. दिलंच पाहिजे”, असं जयंत पाटील म्हणाले.

“उज्ज्वला योजना केंद्र सरकारने आणली होती. उज्ज्वला योजना सगळ्यांकडे पोहोचल्यावर ४०० रुपयांचा घरगुती गॅस सिलेंडर १२०० रुपये केले. अजित दादांनी केवळ तीनच सिलेंडर माफ केले. आमचं सरकार आल्यावर महाराष्ट्रात सिलेंडरची किंमत महाराष्ट्रात ५०० रुपये करु. ५०० रुपयांपेक्षा जास्त रुपये घेणार नाही”, असं जयंत पाटील म्हणाले.

हे ही वाचा:

‘तुमच्या खुर्चीवर दोन लोक बसलेत…’ Rahul Gandhi यांची लोकसभा अध्यक्ष Om Birla यांच्यावर टीका

राहुल गांधींनी संसदेत भगवान शिवाचा फोटो का दाखवला?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss