संभाजी राजेंच्या भूमिकेचं जितेंद्र आव्हाडांनी केलं स्वागत

'वेडात मराठे वीर दौडले सात' (Vedat Marathe Veer Daudale Saat)) आणि 'हर हर महादेव' (Har Har Mahadev) या चित्रपटांबाबत संभाजी राजे छत्रपती (Sambhaji Raje) यांनी घेतलेल्या भूमिकेचे आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी स्वागत केले आहे.

संभाजी राजेंच्या भूमिकेचं जितेंद्र आव्हाडांनी केलं स्वागत

‘वेडात मराठे वीर दौडले सात’ (Vedat Marathe Veer Daudale Saat)) आणि ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev) या चित्रपटांबाबत संभाजी राजे छत्रपती (Sambhaji Raje) यांनी घेतलेल्या भूमिकेचे आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी स्वागत केले आहे. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा खोटा आणि चुकीचा इतिहास मांडण्याची परंपरा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी सुरू केली, असा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला आहे.

संभाजीराजे म्हणाले,”आज छत्रपती शिवाजी महाराजांची पुस्तकं आपण वाचत नाही, ही आपली देखील चूक आहे. त्यामुळे हे लोक इतिहासाची मोडतोड करुन आपल्यासमोर मांडतात. माझी केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला विनंती आहे की, सेन्सॉर बोर्डात ऐतिहासिक चित्रपटांसाठी समिती असावी.’ अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे”. ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटात दाखविण्यात आलेले मावळे हे कोणत्या दृष्टीने मावळे वाटतात? चित्रपटात ड्रामाटायझेशन आवडतं म्हणून काहीही बदल करायचा का? पोस्टरमध्ये मावळ्यांची पगडी काढण्यात आली आहे. पगडी काढणं म्हणजे एक प्रकारचा शोक आहे. संदेश चुकीचा देण्यात येतोय. असा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.

‘वेडात मराठे वीर दौडले सात’ आणि ‘हर हर महादेव’ या चित्रपटांबाबत संभाजी राजे छत्रपती यांनी घेतलेल्या भूमिकेला आता राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट विभागाने देखील जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली इतिहासाच्या विकृतीकरणाचे विकृतीकरण होऊ देणार नाही अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चित्रपट विभागाने घेतली आहे. यासोबतच केंद्रसरकार व राज्य सरकारने चित्रपट सेंसोर बोर्डावर ऐतिहासिक संशोधक मंडळातील सदस्यांची नियुक्ती करावी अशी देखील मागणी राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभागाच्या वतीने करण्यात आलेली आहे.

हे ही वाचा :

Mumbai Traffic Updates : अंधेरीतील गोखले पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद; ‘पश्चिम द्रुतगती’साठी सहा पर्याय

Bharat Jodo Yatra Maharashtra : ‘भारत जोडो यात्रेची’ महाराष्ट्रात एन्ट्री

Thackeray VS Shinde : सिल्लोडमध्ये आज आजी-माजी मुख्यमंत्र्यांच्या पुत्रांची धडाडणार तोफ

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version