spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

जितेंद्र आव्हाडांची कोश्यारींविरोधात संतप्त प्रतिक्रिया, इज्जत प्रिय असेल तर

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी त्यांच्या पदावरून आणि जबाबदारीतून मुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांच्यावर सर्व स्तरांतून टीका करण्यात आली होती,

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी त्यांच्या पदावरून आणि जबाबदारीतून मुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांच्यावर सर्व स्तरांतून टीका करण्यात आली होती, दरम्यान कोश्यारी यांना त्यांचे गृहराज्य उत्तराखंडमध्ये परतायचे आहे. यानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी व्हिडिओ जारी करत इज्जत प्रिय असेल तर गप्प निघून जा, तुम्ही जावं ही महाराष्ट्राची इच्छा अशा शब्दात टीकास्त्र सोडले आहे.

जितेंद्र आव्हाड त्यांच्या व्हिडिओत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. राज्यपाल कोश्यारी यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानावरून महाविकास आघाडी आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले होते. आव्हाडांनी “गेल्या १५ दिवसांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जी वक्तव्ये करण्यात आली आणि सरकारने ह्याबाबत कुठलीही भूमिका न घेतल्यामुळे लोकांच्या मनात प्रचंड चीड निर्माण झाली असून लोकभावनेचा उद्रेक झाला आहे. लोकच विचारत आहेत, की महाराष्ट्र बंद कधी करणार. महाविकास आघाडी बंद करणार म्हणजे करणार” असे ट्वट केले होते.

 आव्हाड म्हणाले की, “जनभावना तुमच्या विरोधात इतकी आहे की लोकांच्या मनात महाराष्ट्र निर्मीतीच्या साठ-सत्तर वर्षात एवढा राग कोणाबद्दल लोकांच्या मनात असेल असं मला वाटत नाही, इतक्या शिव्या कोणत्याच राज्यपालांनी खाल्ल्या नसतील इतक्या शिव्या तुम्ही खाल्ल्या आहेत. तेव्हा यातच शाहनपणा आहे की आपली इज्जत प्रिय असेल तर गप निघून जा. तुम्ही जावं ही महाराष्ट्राची इच्छा आहे.”

आव्हाड म्हणाले की, “राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आपलं डोकं वापरून राजीनामा, पदमुक्त होण्याचं ठरवलं आहे, अहो वाट कसली बघताय? राष्ट्रपती भवनात राजीनामा पाठवून द्या अपोआप स्विकारला जाईल आणि पटकन विमान पकडा आणि आपल्या गावी निघून जा. तुमच्या बॅगा नंतर महाराष्ट्रातेल, मंत्रालयातले किंवा राज्यपाल भवनातले कर्मचारी पॅक करून पाठवून देतील”

हे ही वाचा : 

Kim Jong-un उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उनने केली उत्तराधिकाऱ्याची निवड?

युगपुरूषांची प्रतिमा मलिन करणाऱ्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे-उदयनराजे भोसले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss