spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर केला घणाघाती हल्ला, गद्दार, काकांच्या मृत्यूची बघत होते वाट…

२०२३ मध्ये, अजित पवार यांनी त्यांच्या समर्थक आमदारांसह शरद पवारांच्या विरोधात बंड केले आणि भाजपशी हातमिळवणी केली.

२०२३ मध्ये, अजित पवार यांनी त्यांच्या समर्थक आमदारांसह शरद पवारांच्या विरोधात बंड केले आणि भाजपशी हातमिळवणी केली. महायुतीमध्ये सामील झाले आणि एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्रीही बनले. राष्ट्रवादी पक्षावरही दावा सांगितलां. तेव्हा निवडणूक आयोगाने अजित पवार यांचाच पक्ष अस्सल असल्याचे सांगत शिक्का मारला आणि निवडणूक चिन्हही त्यांच्याच ताब्यात दिले. पण काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर चित्र बदलले. राज्यात महायुतीच्या मोठा फटका बसला, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचाही अवघा एक उमेदवार निवडून आला. त्यामुळे या कमकुवत कामगिरीनंतर अजित पवारांचा प्रभावही कमी झाला आहे. या निकालावर शरद पवार गट खूश असला तरी खरी परीक्षा ही विधानसभेची असेल असे मानले जात आहे.

नुकतीच लोकसभा निवडणूकांची धामधूम संपली असून आता राज्याचे लक्ष आगामी विधानसभा निवडणुकांकडे लागले आहे. विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर अनेक पक्ष हे आपली पोळी कशी भाजेल, लोकांच्या मनात स्थान कसे निर्माण होईल व अत्यधिक मते कशी प्राप्त होतील या दिशेने चोख काम पार पाडण्यासाठी सुरुवात केलेली दिसून येते. विधानसभा निवडणुकीचे राजकीय पक्षांना वेध लागलेले असताना सुद्धा प्रत्येक जण कंबर कसून कामाला लागलेले दिसून येतात. निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना भलताच वेग आला आहे. याचदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर कडाडून हल्ला चढवला. अजित पवार गद्दार असल्याचे सांगत, अशा व्यक्तीवर तुम्ही प्रेम करू शकाल का ? त्यांच्यावर विश्वास ठेवू शकाल का ? भाजपसोबत हातमिळवणी करणाऱ्यांवर विश्वास कसा ठेवता येईल ? असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील प्रमुख नेत्यांपैकी एक असलेल्या जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांचा उल्लेख ‘गद्दार’ असा केला. ते ( अजित पवार) काकांच्या ( शरद पवार) मृत्यूची वाट पहात होते. आपण कधी एखाद्या वृद्ध व्यक्तीच्या मृत्यूची वाट पाहतो का ? ज्या मुलाला चालायला शिकवलं, त्यानेच काकांना बाहेरचा रस्ता दाखवला. अशा गद्दारांना राज्यातील जनता एक दिवस जरूर धडा शिकवेल आणि याचा हिशोब चुकता करेल, अशा शब्दांत आव्हाडांनी अजित पवारांवर तोफ डागली.

हे ही वाचा:

ज्येष्ठ नागरिक, महिला यांच्यासाठी MSRTC आणला ‘हा’ नवा उपक्रम

“ज्या कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थाने जिंकण्याची उर्मी आहे अशा ..” Devendra Fadnavis यांनी दिले कार्यकर्त्यांना आश्वासन

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss