spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राष्ट्रवादीनं सत्तारांचा जाळला पुतळा, ‘अब्दुल सत्तार हा मनुवादाचा कट्टर पुरस्कर्ता’ ; जितेंद्र आव्हाड

सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ करणारे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. सोमवारी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी अब्दुल सत्तार यांच्या पुतळ्यास चप्पलांचा हार घालून तो जाळला. यावेळी डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी, मनुवादाचा महाराष्ट्रातील कट्टर समर्थक अब्दुल सत्तार हेच आहेत. कारण, मनुवादामध्येच महिलांना स्थान आणि किमंत नाही. अन् तोच अब्दुल सत्तार ज्या इस्लाम धर्मातून येतो. त्या इस्लाममध्येही महिलांना मानाचे स्थान आहे. त्यामुळे हा अब्दुल सत्तार इस्लाममध्येही नाही, अशी टीका माजी जितेंद्र आव्हाड यांनी केली.

हेही वाचा : 

Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांच्या आक्षेपार्ह भाषेतील टीकेवर, सुप्रिया सुळे म्हणाल्या…

एका वृत्तवाहिनीशी बोलताना अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांना अत्यंत अश्लाघ्य अशी शिविगाळ केली आहे. सत्तार यांच्या या शिविगाळीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते प्रचंड संतप्त झाले. सोमवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली तसेच ठाणे शहराध्यक्ष तथा ठाणे-पालघर जिल्हा समन्वयक आनंद परांजपे आणि ठाणे-पालघर विभागिय महिलाध्यक्षा ऋता आव्हाड यांच्या उपस्थितीत अब्दुल सत्तार यांच्याविरोधात ठाणे पक्ष कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केले. यावेळी सत्तार यांच्याविरोधात कार्यकर्त्याकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सत्तार ठाण्यात आले तर त्यांचे तोंड काळे करू, असा इशारा यावेळी देण्यात आला.

एका चर्चेत सहभागी झालले असताना जिल्हाधिकार्‍यांना चहा पिणार का, असे विचारल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी नाही, असे म्हटल्यावर ‘काय मग दारु पिता का’, अशी विचारणा केली होती. ही सत्तेची मग्रुरी व माज आहे. खरंतर अपेक्षा अशी होती की आएएस संघटना याची गांभीर्याने दखल घेऊन मुख्यमंत्र्यांना या बाबतचे निवेदन देईल. कारण, राज्यकर्ते हे पाहुणे असतात. पण, आयएएस हे कायमचे मंत्रालयात असतात. राज्य चालविण्यामागे त्यांचा मोठा सहभाग असतो. अशा एखाद्या दारु पिता का, हे विचारुन आयएएसचा अपमान करणे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभत नाही. याची आयएएस अधिकार्‍यांनी गांभीर्याने नोंद घ्यायला हवी, असे आवाहन डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केले.

अब्दुल सत्तारांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही ; रुपाली ठोंबरे

वृत्त उघडकीस आणणार्‍या पत्रकारास धमक्या

अब्दुल सत्त्तार यांनी केलेले हे वक्तव्य उघडकीस आणणार्‍या पत्रकारास जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा गौप्यस्फोटही डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केला. हे वृत्त ज्या पत्रकाराने हे वृत्त प्रसारीत केले. त्याला बघून घेऊ, तुझा जीव घेऊ अशा धमक्या दिल्या जात असल्याचेही आव्हाड यांनी सांगितले.

Latest Posts

Don't Miss