spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

जितेंद्र आव्हाड यांनी दिले बागेश्वर बाबांना खुले चॅलेंज

जितेंद्र आव्हाड यांनी बागेश्वर बाबांवर टीका केली आहे. बागेश्वर बाबा यांनी शिर्डीच्या साईबाबांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांच्या वक्तव्यावरुन जितेंद्र आव्हाड यांनी बागेश्वर बाबांवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी बागेश्वर बाबांना ओपन चॅलेंज दिलं आहे.धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या वक्तव्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड चांगलेच कडाडले आहेत

जितेंद्र आव्हाड यांनी बागेश्वर बाबांवर टीका केली आहे. बागेश्वर बाबा यांनी शिर्डीच्या साईबाबांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांच्या वक्तव्यावरुन जितेंद्र आव्हाड यांनी बागेश्वर बाबांवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी बागेश्वर बाबांना ओपन चॅलेंज दिलं आहे.धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या वक्तव्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड चांगलेच कडाडले आहेत.बागेश्वर बाबा यांनी शिर्डीच्या साईबाबा यांच्याविषयी केलेल्या एका वक्तव्याचे पडसाद राज्यासह देशभरात पडताना दिसत आहेत. बागेश्वर बाबा यांनी साईबाबा यांच्याविषयी केलेल्या दाव्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण तापताना दिसत आहे. तसेच आज अजित पवार यांनी देखील देखील आज यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. यावर ते म्हणाले आहेत की “या बाबा लोकांचे जास्त ऐकू नका. हे भोंदूबाबा आहेत,” असे अजित पवारांनी म्हटले आहे.
विशेष म्हणजे बागेश्वर बाबा यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) चांगलेच संतापले आहेत. त्यामुळे बागेश्वर बाबा यांच्या वक्तव्यावरुन महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.साईंबाबांची पूजा फक्त सनातन पद्धतीने केली जाते. त्यामुळे तुम्ही सर्वानी त्यावर प्रकाश टाका. आपल्या भक्तांच्या या प्रश्नांवर धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, मी साईंना देव मानत नाही. ‘साई संत असू शकतो, फकीर असू शकतो, परंतु देव होऊ शकत नाही’ असं वक्तव्य धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानाला आता प्रचंड विरोध होत आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, मी एक सामान्य माणूस म्हणून विचार करतो की , अनेक लोक ही साईबाबांचे भक्त असतात. मी स्वतः एक साईबाबांचा मोठा भक्त आहे. मी गेल्या अनेक वर्षांपासून शिर्डीत जातो. माझ्या देवघरात देखील साईबाबांची आणि श्री स्वामी समर्थांची मूर्ती आहे. त्यांची दररोज आमच्या पद्धतीने आम्ही पूजा करतो. मी घरातून बाहेर पडताना त्यांना नमन करून हात जोडून मग घराबाहेर पडतो. मी त्यांना देव मानतो. हा बागेश्वर कोण सांगणार की त्यांना देव मानू नका”, अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी सुनावलं.“तुम्ही माझ्या देवाला लांडगा म्हणणार? लांडग्यावर वाघाची कातडी घातली की लांडगा वाघ होत नाही. असे वक्तव्य बागेश्वर बाबा यांनी केले आहे. कोण हा बागेश्वर साईबाबांना असं बोलणारा? सबका मालिक एक म्हणणारा तो साईबाबा. महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्मलेल्या तो साईबाबा. आज लाखो भक्त फक्त लाईन लावून त्याच्या दर्शनाला जातात ते काय वेडे आहेत? असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. हा बागेश्वर एकटा हुशार आहे का? आम्ही गुरुवारी रात्री सर्वजण जाऊन वर्तक नगरच्या शिर्डी साईबाबांच्या प्रतिकृती असलेल्या मंदिरात साईबाबांची आरती करणार आहोत. असेल हिम्मत बागेश्वर तर येऊन थांबून दाखव”, असं चॅलेंज जितेंद्र आव्हाड यांनी दिलं.

हे ही वाचा : 

अस्सल दक्षिण भारतीय सांबर रेसिपी घराच्या घरी

संजय राऊत टीव्हीवर आले की लोकं चॅनेल बदलतात – शंभूराज देसाई

IPL2023, चेन्नई आणि गुजरातची ताकत वाढणार, दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू भारतात दाखल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss