बावनकुळे सोडा लाख कुळे आली तरी नखावरील धूळही उडणार नाही, आव्हाड यांचा बावनकुळे यांना जोरदार टोला

बावनकुळे सोडा लाख कुळे आली तरी नखावरील धूळही उडणार नाही, आव्हाड यांचा बावनकुळे यांना जोरदार टोला

भारताच्या राजकारणात उद्ध्वस्त करु, विसर्जन करु, असा शब्दप्रयोग कधीही आणि कुणीही केलेला नाही. असे शब्द वापरणार्‍यांना त्यांचे शब्द लखलाभ असो. पण, आपण त्यांना एवढेच सांगू इच्छितो की ५२ कुळे नाही; १ लाख कुळे जरी उतरले ना, तरी या सह्याद्रीच्या पहाडाला म्हणजेच शरद पवार यांना काहीही फरक पडणार नाही. त्यांच्या पायाच्या नखावरील धूळही तुम्ही उडवू शकणार नाहीत, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांना लगावला.

बावनकुळे यांनी शरद पवार यांचे बारामतीमध्ये विसर्जन करण्याची भाषा केली होती. त्यांच्या या वक्तव्याचा डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले की, महाराष्ट्राला १९९३ ते ९५ चा काळ आठवत असेल. मुंबईमध्ये गो.रा. खैरनार आणि भाजपचे तत्कालीन मोठे नेते गोपिनाथ मुंडे यांनी शरद पवार यांच्यावर बेछुट आरोप केले. अन् शरद पवार यांना बदनाम करण्याचे षडयंत्र रचले. तेव्हा एक लक्षात आले की पवारांवर आरोप केला की पेपरची हेडलाईन मिळते तसेच वाहिन्यांवर मुख्य बातमी म्हणून पुढील १२ तासाची सोय होते. त्यानंतर १९९९ ते २०१४ या काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेवर होती.

हेही वाचा : 

राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, ‘या’ जिल्ह्यात पावसाची शक्यता

त्यानंतर आताही अडीच वर्षे आम्ही सत्तेत होतो. पण, भारताच्या राजकारणात उद्ध्वस्त करु, विसर्जन करु, असा शब्दप्रयोग कधीही आणि कुणीही केलेला नाही. असे शब्द वापरणार्‍यांना त्यांचे शब्द लखलाभ असो. पण, आपण त्यांना एवढेच सांगू इच्छितो की ५२ कुळे नाही; १ लाख कुळे जरी उतरले ना, तरी या सह्याद्र्ीच्या पहाडाला म्हणजेच शरद पवार यांना काहीही फरक पडणार नाही. त्यांच्या पायाच्या नखावरील धूळही तुम्ही उडवू शकणार नाहीत; आपणाला एका गोष्टीचेआश्चर्य वाटते की, एका ८३ वर्षाच्या तरुणाला हे लोक किती घाबरतात. बारामतीचा गड जिंकून दे असं साकडं बारामतीच्या मारूतीच्या देवळात जाऊन आज कुणीतरी घातलं. ६० वर्षे प्रत्येक निवडणूकीचा फॉर्म आदरणीय शरद पवार साहेब ह्याच मारूतीच्या समोर उभे राहून नंतर दाखल करतात. आज तो मारुती देवळाच्या बाहेर येऊन हसत हसत विचारत होता. हे आत्ता आलेले ते कोण होते ?

अमरावतीमधील आंतरधर्मीय विवाह प्रकरणी, खा.नवनीत राणांचा पोलीस ठाण्यात राडा

शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणाचे केंद्रबिंदू आहेत. त्यामुळे त्यांच्यावर बेलगाम-बेछुट आरोप करीत नाहीत; त्यापर्यंत आपणाला महाराष्ट्राच्या राजकारणात किमंत मिळणार नाही, या प्रकारातून ते लोक हेच मान्य करीत आहेत. मी वैयक्तीक टीका करीत नाही. कोणी उद्ध्वस्त तर कोणी विसर्जन करण्याची भाषा करीत आहेत. आपला त्या शब्दाला आक्षेप नाही. म्हणूनच आम्ही आमच्या भाषेत सांगतो की, कितीही कुळे आली तरी शरद पवार यांच्या नखावरची धुळही ते उडवू शकणार नाहीत, असे डॉ. आव्हाड यांनी सांगितले.

भारताची हिच परंपरा आपण विसरत चाललो आहोत, असे सांगून राजीव गांधी यांनी अटलबिहारी वाजपेयींवर केलेल्या उपचारांची आठवण डॉ. आव्हाड यांनी सांगून पवार यांनी त्यांच्यावर टीका करणार्‍या शेकडो जणांना मदत केली आहे. कोणताही द्वेष मनात ठेवला नाही. त्यांनी कधीच कंबरेखालचे वाट केले केले नाहीत, असेही स्पष्ट केले.

Exit mobile version