जितेंद्र आव्हाडांनी शिंदे गटाला विचारला सवाल

गेल्या दोन दिवसात महाराष्ट्रात जाहिरातीमुळे मोठ्या प्रमाणात चर्चाना उधाण आले आहे, पहिली जाहिरात ही "राष्ट्रात मोदी महाराष्ट्रात शिंदे” अशा मथळ्याखाली शिवसेनेच्या शिंदे गटाने एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली.

जितेंद्र आव्हाडांनी शिंदे गटाला विचारला सवाल

गेल्या दोन दिवसात महाराष्ट्रात जाहिरातीमुळे मोठ्या प्रमाणात चर्चाना उधाण आले आहे, पहिली जाहिरात ही “राष्ट्रात मोदी महाराष्ट्रात शिंदे” अशा मथळ्याखाली शिवसेनेच्या शिंदे गटाने एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. या जाहिरातीने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा वादंग निर्माण झाला आहे. तर शिंदे गटाच्या या जाहिरातीमुळे भाजपा-शिवसेना युतीत काही अंशी तेढ निर्माण झाल्याच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्याचे दिसून आले. शिंदे गटाने प्रसिद्ध केलेल्या या जाहिरातीत फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच फोटो होते. तर या जाहिरातीत देवेंद्र फडणवीसांना डावलल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात नरेंद्र देवेंद्र असं समीकरण ना राहता मोदी आणि शिंदे असे समीकरण तयार झालेलं बघायला मिळत आहे.

राज्यातील प्रमुख वृत्तपत्रांना दिलेल्या या जाहिरातीमुळे जनमाणसांत राज्य सरकारविषयी निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी आज शिंदे गटाने डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. शिंदे गटाने आज राज्यातील प्रमुख वृत्तपत्रांना जाहिरात देऊन “राष्ट्रात मोदी महाराष्ट्रात शिंदे” या जाहिरातीचा “जनतेच्या चरणी माथा, गर्जा महाराष्ट्र माझा” या जाहिरातीने उत्तरार्ध केला आहे. सलग दोन दिवसात शिंदे गटाच्या दोन जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्याने त्यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या जाहिरातींवरून एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे.

एकीकडे म्हणायचं की, ही जाहिरात आम्ही दिली नव्हती (मंगळवारी प्रसिद्ध केलेली जाहिरात शिंदे गटाने दिली नव्हती अशी प्रतिक्रिया मंत्री शंभूराज देसाई यांनी मंगळवारी रात्री दिली होती), मग आजची जाहिरात कुणी दिली? असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. आव्हाड म्हणाले, ही त्यंची महत्त्वकांक्षा आहे. आज नाही तर उद्या ते (एकनाथ शिंदे) म्हणतील मला पंतप्रधानच व्हायचं आहे.त्यामुळे आता राजकारणात या जाहिरातींवरून अजून किती प्रश्न उभे राहणार आहे हे पाहणे महत्वाचे ठरते. यावरून जितेंद्र आव्हाड म्हणाले, शिंदेंची आजची जाहिरात ही सरड्यासारखी आहे. हे सगळं सरड्याच्या रंगांसारखं आहे. त्यांना काहीच वाटत नाही. अख्खा महाराष्ट्र पहिल्या पानावरची जाहिरात वाचतो. आज एक जाहिरात येते, उद्या एक जाहिरात येते. म्हणजे यांनी आपली पॉलिटिकल क्रेडिबिलिटी (राजकीय विश्वासार्हता) शून्य झालीच आहे. परंतु बौद्धिक क्रेडिबिलिटी पण आज शून्य झाली आहे. एकनाथ शिंदे हे सरड्यासारखं वागत आहे असे देखील ते म्हणले

हे ही वाचा:

आनंद महिंद्रांचा थेट नितीन गडकरी यांना मोठा सवाल म्हणाले…

सुप्रिया सुळे यांनी केली खोचक टीका | Supriya Sule | NCP | Sharad Pawar |

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version