जितेंद्र आव्हाडा यांच्या तत्कालीन बॉडीगार्डची आत्महत्या

Jitendra Awhad Bodyguard : राष्ट्रवादीचे नेते आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना धक्का बसला आहे. आव्हाडांचे तत्कालीन बॉडीगार्ड वैभव कदम (Vaibhav Kadam) यांनी आत्महत्या केली आहे. कदम यांच्या आत्महत्या करण्यामागील खरं कारण हे अद्याप उघडकीस आलेलं नाही

जितेंद्र आव्हाडा यांच्या तत्कालीन बॉडीगार्डची आत्महत्या

Jitendra Awhad Bodyguard : राष्ट्रवादीचे नेते आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना धक्का बसला आहे. आव्हाडांचे तत्कालीन बॉडीगार्ड वैभव कदम (Vaibhav Kadam) यांनी आत्महत्या केली आहे. कदम यांच्या आत्महत्या करण्यामागील खरं कारण हे अद्याप उघडकीस आलेलं नाही. वैभव कदम यांच्या निधनाने राजकीय चर्चांना उदान आलं आहे. अनंत करमुसे मारहाण प्रकरणामध्ये वैभव कदम यांचे नाव आरोपी म्हणून समोर आले होते. या प्रकरणी कदम यांची देखील चौकशी सुरु होती.

नेमकं काय आहे करमुसे प्रकरण ?

स्थापत्य अभियंता आणि भाजपचा कार्यकर्ता असलेला अनंत करमुसे याने महाविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालीन मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट समाज माध्यमांवर शेयर केली होती. यानंतर आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी करमुसे याला आव्हाड यांच्या बंगल्यात आणून बेदम मारहाण केली होती. बंगल्यात अनेक जणांनी पोलिसांकडील फायबर काठी तुटेपर्यत मारहाण केली. काठी तुटल्यावर वेताचा बांबू, लोखंडी पाईप आणि कंबरेच्या पट्ट्याने चक्कर येईपर्यंत मारहाण त्यांना मारहाण करण्यात आली होती. हि मारहाण होत असताना स्वतः जितेंद्र आव्हाड त्या ठिकाणी उपस्थित होते.बेदम मारहाण केल्यानंतर करमुसे याला फेसबुकवरील ती पोस्ट डिलीट करायला लावली. नंतर ही पोस्ट चुकून पोस्ट केली, त्याबद्दल माफी मागतो, असा व्हिडिओ त्याच्याकडून रेकॉर्ड करुन घेतल्याचे करमुसे याने पोलिसांना जबाबात म्हटले होते. यानंतर आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र नंतर सर्वांची जामिनावर सुटकाही झाली होती.

ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात वैभव कदम यांच्या आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) शवविच्छेदनासाठी नेण्यात आला असून या आत्महत्या प्रकारावरून वेगळाच संशय हा व्यक्त केला जात आहे. कदम हे अनंत करमुसे मारहाण प्रकरणात स्वतः माफीचे साक्षीदार होते. कदम यांच्या साक्ष देण्यामुळे महत्वाचे धागेदोरे पोलीसांच्या हाती लागणार होते. याप्रकरणी सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी भाजपा ठाणेशहर जिल्हाचिटणीस दत्ता घाडगे यांनी केली आहे.

हे ही वाचा : 

मोठी बातमी!, भाजपचे जेष्ठ नेते गिरीश बापट यांचं निधन

१५०० कोटींचे मॅच फिक्सिंग करणारा बुकी अनिल जयसिंगानीया यांच्या अडचणी वाढणारं

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

 

Exit mobile version