spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘या कोणत्याही कटात मनसे नेत्याचा सहभाग नव्हता’, जितेंद्र आव्हाड यांच्या ट्विटची पुन्हा चर्चा

हरहर महादेव चित्रपटाच्या (Har har mahadev movie) दरम्यान प्रेक्षकाला मारहाण, मुंब्रा येथे महिलेचा विनयभंग असे गुन्हे दाखल झालेल्या राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांनी हा सर्व प्रकार पूर्वनियोजित योजना असल्याचा भांडाफोड केली आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) कार्यकर्त्यांनी व्हिव्हियाना मॉलमध्ये (Viviana Mall) जात हरहर महादेव या चित्रपटाचा खेळ बंद पाडला होता. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एका प्रेक्षकाला मारहाण केली होती. त्यावेळी संबंधित व्यक्तीची महिलाही त्याठिकाणी उपस्थित होती. या महिलेने माझ्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा, यासाठी काही स्थानिक राजकारण्यांचे प्रयत्न सुरु होते, असा गंभीर आरोप जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केला होता.

हेही वाचा : 

मुख्यमंत्र्यांना प्रतापगडावर जाण्याचा अधिकार नाही, संजय राऊत तापले

यानंतर पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाड यांनी विनयभंगाच्या गुन्हावर ट्विट केलंय. त्यात त्यांनी लिहिलंय…. विवियाना मॉलमध्ये झालेल्या गदारोळा नंतर माझ्यावर ३५४ चा कट रचण्यात आला होता. पण तो फसला. त्यात मनसेच्या कुठल्याही नेत्याचा सहभाग नव्हता. ज्यांनी मुंबऱ्याचा कट रचायला लावला तेच रचत होते… विवियानाच्या तक्रारदरावर दबाव टाकून कट रचला. ह्यात इतर कुठल्याही पक्षाचा संबंध नाही.

त्यापुढील ट्विटमध्ये आव्हाड यांनी लिहिलंय- तक्रारदरानी स्वतः कबूल केले की जितेंद्र आव्हाडनी मला बाहेर काढले. तर मग माझे नाव गुन्ह्यात आले कसे? मनसेच्या ठाण्याच्या नेता जर पोलिस स्टेशनला होता तर हे त्यानी थांबवायला हवे होते.. . पण ३५४ च्या कटात तो नव्हता हे सत्य आहे .. ताईला सगळे माहीत आहे… असे आव्हाड यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले.

रीदा राशिद यांनी जितेंद्र आव्हाडांविरोधात विनयभंगाची तक्रार केल्यानंतर आव्हाड यांचा संताप झाला आहे. बाकी कोणतेही गुन्हे चालतील पण ३५४ चा गुन्हा दाखल करणे हे राजकीय सूडाचे कृत्य असल्याचं आव्हाड म्हणाले होते.

DSLR देखील फेल होईल iPhone 15 पुढे, डिझाइनसह कमालीचे अपग्रेड पाहून ग्राहक खुश

आव्हाड यांच्याविरोधात मनसेने हे षडयंत्र रचल्याची चर्चा स्थानिक पातळीवर दबक्या आवाजात सुरु होती. मात्र आव्हाड यांनी वरील ट्विटवरून यात मनसेचा हात नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आव्हाड यांच्या ट्विटचा रोख कुणाकडे आहे? कटात सहभागी असणारे कोण आहेत? याची चर्चा आता सुरु आहे.

नेमकं काय घडलं होतं?

हर हर महादेव या वादग्रस्त चित्रपटाचा शो विवियाना मॉल येथे सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हा चित्रपट बंद पडला. मात्र याच दरम्यान आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांकडून एका प्रेक्षकाला मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणी आव्हाड यांना अटक देखील केली होती. मात्र, याप्रकरणात ठाणे न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता.

Zombie virus शास्त्रज्ञांनी दिली चेतावणी, ४८ हजार वर्ष जुना ‘झोम्बी व्हायरस’ पुन्हा जिवंत

Latest Posts

Don't Miss