Sunday, July 7, 2024

Latest Posts

Soniya Duhan यांच्या आरोपांवर Jitendra Awhad यांचे प्रतिउत्तर

आता लोकसभा निवडणुकीचे पर्व जरी संपत आले असले तरी पक्षांमधील अंतर्गत वाद विवाद आणि टीका करणे काही संपलेली नाही. शरद पवार (NCP Sharadchandra Pawar) गटातील सोनिया दुहान (Sonia Duhan) यांनी सुप्रिया सुळेंवर (Supriya Sule) गंभीर आरोप केले होते. यावर आता जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election 2024) सहावा टप्पा २६ मे रोजी पार पडला असून शेवटचा टप्पा म्हणजेच सातवा टप्पा १ जूनला पार पडेल. त्यानंतर ४ जूनला निकाल लागणार असून निकालाची आतुरता संपूर्ण देशालाच लागली आहे. आता लोकसभा निवडणुकीचे पर्व जरी संपत आले असले तरी पक्षांमधील अंतर्गत वाद विवाद आणि टीका करणे काही संपलेली नाही. शरद पवार (NCP Sharadchandra Pawar) गटातील सोनिया दुहान (Sonia Duhan) यांनी सुप्रिया सुळेंवर (Supriya Sule) गंभीर आरोप केले होते. यावर आता जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

धीरज शर्मा (Dhiraj Sharma) यांनी शरद पवार (Sharad Pawar) गटातून बाहेर पडल्यानंतर सोनिया दुहान (Soniya Duhan) ही पक्ष सोडतील का अश्या चर्चांना उधाण आलं होत. यावर सोनिया दुहान यांनी प्रतिक्रिया दिली होती, परंतु याचसोबत सुप्रिया सुळेंवर (Supriya Sule) त्यांनी गंभीर आरोप देखील केले होते. सोनिया म्हणाल्या होत्या, “पक्षातील मी असेल किंवा धीरज शर्मा असतील आमच्यासाठी शरद पवारच नेते होते आणि राहतील. आमच्या ज्या खासदार आहेत ज्या शरद पवार यांच्या कन्या आहेत त्यांच्याबद्दल आम्हाला सन्मान आहे. पण सुप्रिया सुळे एक नेत्या कधीच बनू शकल्या नाहीत. त्यांची मुले किंवा त्यांच्या आसपासच्या काही लोकांमुळे आमच्यासारखे एकनिष्ठ लोक आहेत जे शरद पवारांसाठी काहीही करू शकतात, अशी लोकं निर्णय घेऊन पार्टी सोडून जात आहेत. मी आजपर्यंत पक्ष सोडला नाहीये परंतु, मी देखील लवकरच पक्ष सोडणार आहे. पण मी दुसऱ्या कुठल्या पक्षात जाणार नाही. सध्यातरी मी कुठलाही निर्णय घेणार नाही. मी पूर्ण एकनिष्ठ आहे. सुप्रिया ताईंच्या आजूबाजूला असे काही लोक आहेत, जे पक्षात काम करणाऱ्या लोकांना संपवण्याचं, हटवण्याचं आणि मजबूर करण्याचं काम करत आहेत.”

त्यांनी केलेल्या या विधानावर आता जितेंद्र आव्हाड (Jitendra Aavhad) यांनी उत्तर दिले आहे. “सोनिया दुहान ही पक्षाची इंदिरा गांधी (Indira Gandhi) आहे का?” असा सवाल त्यांनी केला. पुढे ते म्हणाले, “अजितदादांना दूरदृष्टी असल्याने कदाचित त्यांना महाराष्ट्राची परिस्थिती समजली असेल. ती चांगली नाही. छगन भुजबळ साहेब देखील म्हणतायत कि महाराष्ट्राची परिस्थिती चांगली नाही. अजून दोन-तीन मंत्री असं म्हणाले आहेत,ज्यांची नावे मला घ्यायची नाही. ज्यांना जे दिसतंय ते बोलतायत. महायुतीत मतभेद हाणामारी काहीही होउदे, मला काय घेणं देणं? मी घरात बसून चाय पितो. चार तारखेपर्यंत आराम आहे मला आराम करूद्या.”

हे ही वाचा:

“भाजप मोठा भाऊ आहे हे मान्य आहे”; “त्या” वक्तव्यावरुन Chhagan Bhujbal यांचं स्पष्टीकरण

Randeep Hooda ठरला ‘या’ महत्वपूर्ण पुरस्काराचा मानकरी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss