Jitendra Awhad: विनयभंगाच्या प्रकरणानंतर ‘या’ ट्विटमुळे; जितेंद्र आव्हाड पुन्हा चर्चेत

ज्यात काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचा एक फोटो ट्विट केला आहे.ज्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

Jitendra Awhad: विनयभंगाच्या प्रकरणानंतर ‘या’ ट्विटमुळे; जितेंद्र आव्हाड पुन्हा चर्चेत

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी नुकताच गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर जितेंद्र आव्हाड आणि इतर नेत्यांमध्ये सुरु झालेल्या आरोपप्रत्यारोपांचे सत्रामुळे आणि मग जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा देण्याबाबतच्या केलेल्या ट्विटमुळे राज्यात बराच काळ राजकीय वातावरण तापले होते. पण,आता अशाच एका ट्विटमुळे जितेंद्र आव्हाड चर्चेत आले आहेत.

जितेंद्र आव्हाडांनी विनयभंगाच्या प्रकरणासंबंधित एक ट्विट केले आहे. ज्यात काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचा एक फोटो ट्विट केला आहे.ज्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केलं असून यामध्ये प्रियंका गांधी यांचा एका आंदोलनादरम्यानचा फोटो ट्विट केला आहे. या फोटोमध्ये प्रियंका गांधींना एक पुरुष पोलीस जबरदस्तीनं दूर ढकलताना दिसत आहे. या फोटोला आव्हाडांनी कॅप्शन दिलेलं नाही पण हॅशटॅग वापरला आहे. #354 असा हॅशटॅग वापरत त्यांनी भारतीय दंड विधानातील कलम ३५४ ची आठवण करुन दिली आहे. पण आता प्रियंका गांधी यांचा एक फोटो ट्विट करत त्यांनी हा प्रकार विनयभंगाचा प्रकार असल्याचं सुचवलं आहे. याद्वारे आव्हाडांनी पुन्हा एकदा हा मुद्दा उपस्थित केला आहे. पण त्यांनी हे ट्विट करताच नेटकऱ्यांकडून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. ज्यात काही नेटकरी हे त्यांच्या ट्विटचे समर्थन करतायत तर काहीजण त्यांच्या या ट्विटवर टीका करतायत.

नेमके काय आहे प्रकरण?

रविवारी कळवा आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या तिसऱ्या कळवा खाडी पुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी खासदार श्रीकांत शिंदे, आमदार जितेंद्र आव्हाड आणि पीडित महिलेसह अन्य नेते उपस्थित होते. हर हर महादेव सिनेमावरुन विवियाना मॉलमध्ये झालेल्या राड्याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याप्रकरणी त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. तर रविवारी कळवा-मुंब्रा नवीन पुल उद्घाटनाच्या कार्यक्रमादरम्यान महिलेनं विनयभंगाचा आरोप केल्यानंतर जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्यात आला. हे दोन गुन्हे दाखल झाल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी आमदारकीचा राजीनामा देत असल्याचं ट्वीट केलंय.

हे ही वाचा:

Exclusive : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे कोणाचे ?

मोठी बातमी! फक्त शिंदे गटच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘हा’ बडा नेता देखील जाणार गुवाहाटीला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version