माफी मागितली, पण उघडकीस आलेला भ्रष्टाचार मान्य केला नाही, Jitendra Awhad यांची PM Narendra Modi यांच्यावर टीका

माफी मागितली, पण उघडकीस आलेला भ्रष्टाचार मान्य केला नाही, Jitendra Awhad यांची PM Narendra Modi यांच्यावर टीका

सिंदुधुर्गातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली. या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माफीदेखील मागितली. आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर त्यांची पहिली प्रतिक्रिया ही दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शुक्रवार, ३० सप्टेंबर) महाराष्ट्राच्या भेटीदरम्यान पालघरमधील वाधवन बंदराची पायाभरणी केली. यादरम्यान सिंधुदुर्गात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पडझड झाल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी माफी मागितली आहे. परंतु, आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी यावरून पंतप्रधान मोदींवर जोरदार आगपाखड केली आहे.

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून भाष्य करत पंतप्रधान मोदींवर भाष्य केले. ते म्हणाले, “आज पंतप्रधानांनी महाराजांची माफी मागितली, पण उघडकीस आलेला भ्रष्टाचार मान्य केला नाही, ना त्यावर एकही शब्द काढला. जिथे महात्म्यांचा आदर करण्याचा विषय येतो, तिथे हे सरकार केवळ भावनांचा खेळ करतं, केवळ प्रतीकांचा उदोउदो करतं.”

ते पुढे म्हणाले, “ज्या महाराजांचा आदर्श केवळ भारत देश नाही, तर संपूर्ण जग घेतं, त्यांच्यासारखं सुशासन हे काही माफी मागून घडत नसतं. त्यासाठी भ्रष्टाचारावर आळा घालायचा असतो, आपल्या भ्रष्टाचारी राज्यकर्ते व अधिकाऱ्यांचे कान पिळायचे असतात, त्यांना जागेवर धडा शिकवायचा असतो. मनापासून रयतेच्या गरजांचा विचार आणि त्यांची सेवा करायची असते. तेव्हाच, आपण केलेलं बांधकाम ३-४ शतकांनंतरच्या पिढीलाही पाहायला, जगायला आणि वापरायला मिळतं. नाहीतर, खोटी प्रतीकं आणि खोट्या भावनांच्या पायावर उभारलेलं राज्य ढासळायला ८ महिनेही लागत नाहीत.”

पंतप्रधान मोदींनी मागितली माफी

पंतप्रधान मोदी म्हणाले, “जेव्हा २०१३ मध्ये भाजपने मला पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून निश्चित केले होते, तेव्हा मी रायगड किल्ल्यावर जाऊन प्रार्थना केली होती. एक भक्त ज्या भावनेने आपल्या देवतेची पूजा करतो, त्याच भावनेने मला देशाची सेवा करायची आहे.” यावेळी पंतप्रधान मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांची माफीही मागितली. ते म्हणाले, “सिंधुदुर्गात नुकतेच जे काही घडले, ते माझ्यासाठी आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त एक नाव नाही, ते फक्त एक राजा, महाराज नाहीत, आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे पूजनीय दैवत आहेत. आज मी नमन करतो. माझे मस्तक आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा.” मी तुमच्या चरणी डोके ठेवून माफी मागतो.”

पालघरमध्ये जनतेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी सावरकरांचाही उल्लेख केला. ते म्हणाले, “आमची मूल्ये वेगळी आहेत. भारतमातेचे शूर सुपुत्र वीर सावरकर यांना शिवीगाळ करणारे आणि देशभक्तांच्या भावना चिरडणारे आम्ही नाही. वीर सावरकरांना शिवीगाळ करूनही आम्ही माफी मागायला तयार नाही. महाराष्ट्राचा आहे. अशी मूल्ये जनतेला कळावीत, मी छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागण्याचे काम करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “एक काळ असा होता जेव्हा भारताची गणना जगातील सर्वात समृद्ध आणि शक्तिशाली राष्ट्रांमध्ये केली जात होती. भारताच्या या समृद्धीचा एक मोठा आधार होता भारताची सागरी शक्ती… आपली ही शक्ती महाराष्ट्रापेक्षा चांगली होती आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी देशाच्या प्रगतीसाठी काय निर्णय घेतले होते, हे कोणाला माहीत असेल.”

हे ही वाचा:

भारताला पुढे नेण्याचे काम हे केवळ नरेंद्र मोदी यांनी केले आहे; Devendra Fadnavis

शरद पवारांनी Z+ सुरक्षा घेण्यास दिला नकार, CRPF अधिकाऱ्यांना केले परत, सविस्तर घ्या जाणून

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version