हर हर महादेव चित्रपटाच्या शो बंद करण्यावरून ठाण्यातील विवियाना मॉल राडा, जितेंद्र आव्हाडांच्या १०० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

हर हर महादेव चित्रपटाच्या शो बंद करण्यावरून ठाण्यातील विवियाना मॉल राडा, जितेंद्र आव्हाडांच्या १०० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

प्रसिद्ध अभिनेता शरद केळकर आणि सुबोध भावे यांचा बहुचर्चित हर हर महादेव चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटामध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात आल्यानं काल संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. काल ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये प्रेक्षक हर हर महादेव चित्रपट पाहण्यासाठी आले. मात्र या प्रेक्षकांना राजकारणांनी वेगळाच पिक्चर दाखवला. विवियाना मॉलमधील राड्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्या १०० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झालाय. वर्तकनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राष्ट्रवादीच्या या आंदोलनानंतर मनसे नेते अविनाश जाधव यांनी विवियाना मॉल गाठलं आणि चित्रपटाचा शो पुन्हा सुरू केला. यावेळी अविनाश जाधव यांनी शो बंद करून दाखवा असं थेट आव्हान आव्हाडांना दिलं. विवियाना मॉलमधील राड्याप्रकरणी आव्हाड यांच्या १०० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झालाय. वर्तकनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कलम १४१,१४३,१४६, १४९, ३२३, ५०४, मुंबई पोलीस कायदा कलम ३७/१३५ आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी परीक्षित विजय धुर्वे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल, असा असेल राहुल गांधींचा आजचा कार्यक्रम

काल संभाजीराजे छत्रपती यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये हर हर महादेवच्या निर्मात्यांना इतिहासाची मोडतोड केल्याबद्दल फटकारले होते. संभाजीराजे छत्रपती यांनी आक्षेप घेतल्यानंतर आता पिंपरीतील विशाल थिएटरमध्ये हर हर महादेवचा शो बंद पाडण्यात आला आहे. तसेच संभाजी बिग्रेडच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत या चित्रपटाचा शो बंद पाडण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. सध्या सोशल मीडियावर हर हर महादेव आणि महेश मांजरेकर यांच्या वेडात मराठे वीर दौडले सात यांच्या चित्रपटावर मोठा वाद सुरु झाल्याचे सांगण्यात आले आहे.

सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली इतिहासाच्या विकृतीकरणाचे विकृतीकरण होऊ देणार नाही अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चित्रपट विभागाने घेतली आहे. यासोबतच केंद्रसरकार व राज्य सरकारने चित्रपट सेंसोर बोर्डावर ऐतिहासिक संशोधक मंडळातील सदस्यांची नियुक्ती करावी अशी देखील मागणी राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभागाच्या वतीने करण्यात आलेली आहे.

व्हेज सोया चाप मसाला मांसाहराची कमतरता भरून काढेल, अशा प्रकारे बनवा

Exit mobile version