Jitendra Awhad: राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना अटक

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (NCP leader Jitendra Awad) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ठाण्यातील वर्तकनगर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

Jitendra Awhad: राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना अटक

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (NCP leader Jitendra Awad) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ठाण्यातील वर्तकनगर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये सुरु असलेला हर हर महादेव (Har Har Mahadev) चित्रपटाचा शो बंद पाडला होता. यावेळी एका प्रेक्षकाला मारहाण करण्यात आली होती. त्या प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. या अटकेनंतर आपण जामीन घेणार नसल्याचेही जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले आहे.

 राड्याप्रकरणी आव्हाड यांच्या १०० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला होता. वर्तकनगर पोलिसात गुन्हा कलम १४१ , १४३,१४६, १४९, ३२३, ५०४ मुंबई पोलीस कायदा कलम ३७/१३५ आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी परीक्षित विजय धुर्वे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा : 

PM मोदी ‘मिशन दक्षिण’निमित्त, ४ राज्यांना भेट देणार, २५ हजार कोटींहून अधिक किमतीचे प्रकल्पांचा शुभारंभ

दहशतवादी हल्ल्याचा धोका लक्षात घेता मुंबईत ड्रोन उडवण्यावर बंदी, मुंबई पोलिसांचे आदेश जारी

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version