Sunday, July 7, 2024

Latest Posts

मनुस्मृतीवरून राजकारण तापले, येत्या २९ तारखेला मनुस्मृतीचे दहन कारण्याचा Jitendra Awhad यांचा निर्णय

आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी याला जोरदार विरोध केला असून 'येत्या २९ तारखेला मनुस्मृतीचे दहन करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा (Manusmriti) समावेश होण्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे, राज्यात मनुस्मृतिवरून राजकारण सुरु झाले आहे. महाराष्ट्र शिक्षण मंडळाने (Maharashtra State Board) मुलांच्या अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या श्लोकांचा समावेश करण्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अश्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (NCP Sharad Pawar) गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी याला जोरदार विरोध केला असून ‘येत्या २९ तारखेला मनुस्मृतीचे दहन करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी संवाद साधत सांगितले, “येणाऱ्या २९ तारखेला सगळ्या बहुजनांना एकत्र करून आम्ही मनुस्मृतीचे दहन करणार आहोत. महाड मध्ये. बलिदान गेले तरी चालेल. पण पुस्तकात मनुस्मृती येऊन देणार नाही. स्त्रियांविषयी जे मनुस्मृती मध्ये लिहले आहे ते वाचा. ज्योतिबा फुले यांनी शाळा सुरू केली नाही, तोपर्यंत ब्राह्मण स्त्रियांना देखील शिक्षण घेता येत नव्हतं. १९५० ला संविधान म्हणजेच मनुस्मृती असल्याचे सांगितले. बाबासाहेबांनी महिलांसाठी मनुस्मृती जाळली. तामिळनाडू पेरियार आणि आंबेडकर यांनी विरोध केला. त्यांनी महाडला ज्योती पेटवली तर आता संपूर्ण देशभरात ही ज्योत पेटेल. स्त्रिया म्हणजे पायातल्या चपला असे मनुचे म्हणणं आहे. स्त्रियांना हे पटत का? स्त्री आणि पुरुष समानता मी मानतो.”

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या ३०० पारबाबत बोलताना ते म्हणाले, “जनतेच्या डोळ्यात भाजप हद्दपार दिसत होत. ही निवडणूक जनतेने हातात घेतली. कोणाशीही काही न बोलता घरी निघून गेली. न बोलणारी लोक ही डेंजर असतात. ती सत्तेच्या विरोधात असतात.”

हे ही वाचा:

Pune Car Accident: त्या रात्री अनेकांनी आपले ईमान विकले, Ravindra Dhangekar यांची प्रतिक्रिया

…तर राष्ट्रवादीकडे कायम मुख्यमंत्री पद राहिलं असतं; Ajit Pawar यांचे गौप्यस्फोट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss