spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

सर्वांत ढोंगी आणि असंवेदनशील पंतप्रधान म्हणून PM Narendra Modi यांच्या नावाची नोंद, मणिपूर हिंसाचारावरून Jitendra Awhad संतप्त

गेल्या १६ महिन्यांपासून धगधगत असलेल्या मणिपूरमध्ये (Manipur) पुन्हा एकदा हिंसाचाराची ठिणगी पडली आहे. गेल्या तीन दिवसात झालेल्या हिंसाचारात सात जणांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे पोलीस महासंचालक आणि राज्याच्या सुरक्षा सल्लागारांना हटवण्याच्या मागणीसाठी राजभवनावर काढण्यात आलेल्या मोर्चादरम्यान आंदोलक आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या धुमश्चक्रीत चाळीसहून अधिक विद्यार्थी जखमी झाले. या पार्श्वभूमीवर मणिपूरमध्ये तीन दिवस संचारबंदी लागू करण्यात आली असून संपूर्ण राज्यात पाच दिवसांसाठी इंटरनेट सेवा स्थगित केली आहे. आता यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे (NCP Shrad Pawar) आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी भाष्य करात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर निशाणा साधला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून पोस्ट करत मणिपू मुद्यावर भाष्य केले आहे. ते यावेळी म्हणाले, “मणिपूर पेटले! वर्तमानपत्रातील या हेडलाईन्ससुद्धा आता सामान्य झाल्या आहेत, इतकं केंद्र सरकार निगरगट्ट आहे. मणिपूरमधील परिस्थिती चिघळून आता जवळपास १६ महिने होतील. तेथील हिंसाचारात आजवर असंख्य बळी गेले आहेत आणि मुली, बहिणी, माता लैंगिक अत्याचाराला बळी पडतायत, इंटरनेट सेवा बंद आहेत, शेकडोंनी नागरिक, विद्यार्थी जखमी झालेत, शाळा-महाविद्याले बंद आहेत, स्वतंत्र भारतात नागरिक सरकारी छावण्यांत राहतायत पण कुणाला कसालाही फरक पडत नाहीए. देशाच्या पंतप्रधानांना युक्रेन-रशियाचं युद्ध मिटवण्यात स्वारस्य आहे, परंतु ते एकदाही मणिपुरात गेलेले नाहीत. देशाचे सर्वांत ढोंगी आणि असंवेदनशील पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींच्या नावाची नोंद करावी लागेल,” अश्या शब्दांत त्यांनी आपल्याया भावना मांडल्या आहेत.

मणिपूरमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु असलेला वाद पुन्हा उफाळून आला आहे. कांगपोकपि जिल्ह्यात दोन सशस्त्र गटांमध्ये रविवारी (८ सप्टेंबर) संघर्ष झाला. राज्याच्या विविध भागांत गेल्याचे तीन दिवसांत झालेल्या हिंसाचारात सात जणांचा मृत्यू झाला आहे. वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेसाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या दोन नव्या बटालियान तैनात करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत.

हे ही वाचा:

PM Narendra Modi युक्रेनमध्ये जातात पण पेटलेल्या मणिपूरला भेट देत नाहीत: Sanjay Raut

नागपूर अपघातप्रकरणी Sushma Andhare पोचल्या नागपुरात, पोलीस स्टेशनमध्ये घुसून पोलीस अधिकाऱ्याला धरले धारेवर

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss