spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

जितेंद्र आव्हाडांनी दिला इशारा, सत्तेसाठी वाटेल ते सहन करणार नाही

दि २३ जानेवारी म्हणजेच हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Chief Balasaheb Thackeray) यांच्या जयंतीदिनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची युती जाहीर करण्यात आली.

दि २३ जानेवारी म्हणजेच हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Chief Balasaheb Thackeray) यांच्या जयंतीदिनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची युती जाहीर करण्यात आली. तसेच त्यावेळी उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी बोलत असताना दोन्ही नेत्यांनी शिंदे गट आणि भाजप वर जोरदार टीका तर केलीच पण त्याचसोबत त्यांनी महाविकास आघाडीतील नेत्यावरही टीका केली. त्यानंतर आज प्रकाश आंबेडकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

 आज प्रकाश आंबेडकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केले आहे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यावर निशाणा साधला आहे. महाविकास आघाडी मधील घटक पक्षातील नेतृत्वाने किंवा त्यांच्या मित्रपक्षातील नेतृत्वाने शरद पवार साहेबांबद्दल बोलताना आदराने बोलावं. मतभेद सगळ्यांचेच असतात, पण त्याच्यातून विष ओकलं जाऊ नये. हे पटण्यासारखं नाही.तेव्हा सगळ्यांनीच काळजी घ्यावी. सत्तेसाठी वाटेल ते सहन करणार नाही, असा इशारा जितेंद्र आव्हाडांनी ट्विटच्या माध्यमातून दिला आहे.

प्रकाश आंबेडकर काय म्हणाले होते –

शरद पवार हे आजही भाजपबरोबर आहेत. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा सकाळचा शपथविधी झाला होता. त्यानंतर तीन-चार दिवसाने एका वृत्तपत्रात अजित पवारांनी मुलाखत छापून आली होती. त्यात अजित पवारांनी सांगितले की, लोक मला का दोष देत आहेत, समजत नाही. हे आमच्या पक्षांचे ठरले होते. मी फक्त पहिला गेलो, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले होते.

हे ही वाचा:

Hindenburg रिसर्च कंपनीविरुद्ध गौतम अदानी करणार कडक कारवाई, जाणून घ्या काय आहे प्रकरण

WPL Team Auction महिला आयपीएलमध्ये होणार अदानी विरुद्ध अंबानी लढत, तर इतक्या रुपयांना दोघांनी विकत घेतले संघ

Republic Day 2023, यंदा प्रजासत्ताक दिनानिम्मित व्हाट्सअँप द्वारे द्या शुभेच्छा!

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss