Jitendra Awhad : “…त्याला विनयभंग म्हणता येत नाही”; जितेंद्र आव्हाडांच्या पत्नीची पहिली प्रतिक्रिया

Jitendra Awhad : “…त्याला विनयभंग म्हणता येत नाही”; जितेंद्र आव्हाडांच्या पत्नीची पहिली प्रतिक्रिया

ठाण्यातील विवियाना मॉलमधील चित्रपटगृहात प्रेक्षकांना मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर कोर्टाकडून आव्हाड यांची जामीनावर सुटका करण्यात आली. त्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत जितेंद्र आव्हाड यांच्यावर आणखी एका गुन्हा दाखल झाला आहे. एका महिलेनं आव्हाड यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे. मुंब्रा पोलिसांनी आव्हाड यांच्याविरोधात कलम ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असताना दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांची पत्नी ऋता आव्हाड यांनी कारवाईवर प्रश्न उपस्थित केले आहेत. तक्रारदार महिलेविरोधात गुन्हे दाखल असून त्या जामिनावर असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. आव्हाडांविरोधात तक्रार करणाऱ्या महिलेचा विशिष्ट हेतू असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : 

Jitendra Awhad : तक्रारदार महिलेनं मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, अन सारी चक्रं फिरली; जितेंद्र आव्हाडांचा दावा

जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी प्रश्न उपस्थित केले. त्यांनी ट्वीट करत म्हटले की, ज्या महिलेने ही तक्रार दाखल केली आहे, त्यांच्याकडे मोटीव्ह आहे. छट पुजेवरून झालेल्या बाचाबाचीत त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असून त्या जामिनावर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि आव्हाडांविरोधात आक्षेपार्ह बोलल्या आहेत. अंगावर धडकणाऱ्या व्यक्तिला बाजूला करणे गुन्हा असेल तर बाजारात, ट्रेन मध्ये, रेल्वे पुलावर, गर्दीमध्ये रोज शेकड्यांनी ‘विनयभंग’ होत असतील, असेही त्यांनी म्हटले. त्या महिला राजकारणी महत्वाकांक्षा बाळगतात आणि काल रात्री त्या कुणाला तरी भेटल्या. त्यांच्यावर पण अॅट्रोसिटी चा गुन्हा दाखल झाला आहे. जे काही घडलं ती spontaneous reaction होती. त्याला विनयभंग म्हणतां येत नाही असेही त्यांनी म्हटले.

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतप्त भूमिकेत

दरम्यान, आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचा गु्न्हा दाखल होताच आज सकाळपासून राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते आणि आव्हाड समर्थकांनी मुंब्रा पोलीस ठाण्यासमोर निदर्शनाला सुरुवात केली आहे. आव्हाड समर्थकांनी मुंब्रा पोलीस ठाण्याबाहेर ठाण मांडून घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली आहे. तसंच पोलीस ठाण्याचं प्रवेशद्वार देखील कार्यकर्त्यांनी बंद केलं आहे.

Jitendra Awhad : आव्हाड पुन्हा अडचणीत, महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी ७२ तासात दुसरा गुन्हा दाखल

रविवारी ठाणे आणि कळवा या दोन्ही शहरांना जोडणाऱ्या तिसऱ्या खाडी पुलाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमानंतर जितेंद्र आव्हाड हे मुख्यमंत्री शिंदेंच्या गाडीच्या बाजूने कार्यकर्त्यांच्या गर्दीमधून वाट काढून पुढे सरकत असतानाच रिदा रशीद हा त्यांच्या वाटेत आल्या. त्यावेळी आव्हाड यांनी रशीद यांच्या खांद्याजवळ पकडून बाजूला लोटल्याचं रिदा यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

मोठी बातमी! राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाडांचा आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय

Exit mobile version