spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

ज्योतिरादित्य सिंधियांनी इंडिगो प्रकरणात केला तेजस्वी सूर्याचा बचाव म्हणाले, “चूकून इमर्जन्सी एक्झिट उघडली”

"सत्य पडताळून पाहणे आवश्यक आहे. फ्लाइट जमिनीवर असताना चुकून दरवाजा उघडला गेला आणि सर्व तपासण्यांनंतर फ्लाइटला उड्डाणाची परवानगी देण्यात आली.

इंडिगोच्या फ्लाइटचे इमर्जन्सी गेट उघडण्याच्या वादात केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भाजप नेते तेजस्वी सूर्या यांचा बचाव केला आहे. तेजस्वी सूर्या यांचे नाव न घेता सिंधिया म्हणाले, “सत्य पडताळून पाहणे आवश्यक आहे. फ्लाइट जमिनीवर असताना चुकून दरवाजा उघडला गेला आणि सर्व तपासण्यांनंतर फ्लाइटला उड्डाणाची परवानगी देण्यात आली. त्यांच्या चुकीबद्दल त्यांनी माफी मागितली आहे.”

गेल्या महिन्यात, भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांनी चेन्नई विमानतळावर इंडिगो फ्लाइटमध्ये चढल्यानंतर त्याचा आपत्कालीन दरवाजा उघडला. या मुद्द्यावरून काँग्रेसने तेजस्वी सूर्या यांच्यावर टीकेची झोड उठवली होती आणि याविरुद्ध अनेक निदर्शने देखील केली होती. कर्नाटक काँग्रेसने म्हटले होते की, “नादान मुलाला जास्तीची सूट दिल्यावर काय होईल, याचे तेजस्वी सूर्या हे उदाहरण आहेत. विमानाचा आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुलाचा खोडसाळपणा चव्हाट्यावर आला आहे. प्रवाशांच्या जीवाशी हि चेष्टा कशासाठी?”

कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांनीही तेजस्वी सूर्या यांच्यावर हल्ला चढवला, “सुरक्षित उड्डाणासाठी आणि सुरक्षितपणे उतरण्यासाठी नेहमी काँग्रेससोबत उड्डाण करा.” दरम्यान, काँग्रेसचे सरचिटणीस प्रभारी रणदीप सिंग सुरजेवाला यांनी ट्विट केले, “भाजपचा व्हीआयपी पोरकट मुलगा! एअरलाइन कंपनीची तक्रार करण्याची हिम्मत कशी झाली? ही भाजपच्या सत्ताधारी वर्गाची प्रथा आहे का? प्रवाशांचे जीवाशी तडजोड कशासाठी?

काय आहे संपूर्ण प्रकरण?

ही घटना गेल्या महिन्यात १० डिसेंबर २०२२ ची आहे. इंडिगोचे विमान चेन्नईहून तिरुचिरापल्लीला जात होते. डीजीसीएने आपल्या निवेदनात म्हटले होते की, “इंडिगो फ्लाइट 6E-7339 मध्ये एका प्रवाशाने आपत्कालीन दरवाजा उघडल्याने घबराट निर्माण झाली. डीजीसीएने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले जेव्हा हे कळले की भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांनी आपत्कालीन गेट उघडला.त्यानंतर विरोधकांनी भाजपविरोधात टीका करायला सुरुवात केली. पण, आता ज्योतिरादित्य सिंधिया यांनी यावर वक्तव्य केलं आहे.

हे ही वाचा:

मोदींच्या दौऱ्यामुळे मुंबईतील वाहतूक व्यवस्थेत केले बदल

शाळेच्या पिकनिकमध्ये केली राज ठाकरेंनी एन्ट्री

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss