के.चंद्रशेखर राव यांनी “अबकी बार,किसान सरकार” केली घोषणा

तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रातून आपल्या 'भारत राष्ट्र समिती' (बीआरएस) या पक्षाच्या विस्ताराला सुरुवात केली आहे.

के.चंद्रशेखर राव यांनी “अबकी बार,किसान सरकार” केली घोषणा

तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रातून आपल्या ‘भारत राष्ट्र समिती’ (बीआरएस) या पक्षाच्या विस्ताराला सुरुवात केली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आज विठ्ठलाचे दर्शन घेणार आहेत. केसीआर आपल्या आमदार, खासदार आणि मंत्र्यांसह काल सोलापुरात आले आहेत. त्यांच्यासोबत ६०० गाड्यांचा ताफा आहे. आज केसीआर यांनाच व्हीआयपी दर्शन देण्यात येणार असून त्यांच्या इतर सहकाऱ्यांबाबत अद्याप निर्णय घेण्यात आला नाही. केसीआप ९. ३० वाजता विठ्ठलाचे दर्शन घेतील. त्यानंतर ते वारकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. सकाळी १०. ३० वाजता केसीआर सरकोलीत जाणार असून त्याठिकाणी भागिरथ भालके यांचा पक्षप्रवेस होणार आहे. त्यानंतर दुपारे ते तुळजापूरला जाणार असून तुळजाभवानीचे दर्शनही ते घेणार आहेत. संध्याकाळी ४. ३० वाजता ते हैदराबादला रवाणा होतील.

केसीआर हे पंढरपूर येथे दर्शनाला येत असताना हिंदूराष्ट्र सेनेने मोठी मागणी केली आहे. केसीआर आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला विठ्ठलाच्या व्हीआयपी दर्शनासाठी परवानगी देऊ नये, अशी मागणी हिंदूराष्ट्र सेनेच्या सोलापूर शाखेने केली आहे. चंद्रशेखर राव यांच्या मुक्कामासाठी सोलापूरात वेगवेगळ्या हॉटेलमध्ये २२५ खोल्यांची व्यवस्था करण्यात आली असून त्यांच्या स्वागतासाठी शहरात तेलुगू भाषिकांचा प्रभाव असलेल्या भागात बीआरएस पक्षाचे ध्वज उभारण्यात आले आहेत. आज रात्री केसीआर यांच्यासह त्यांच्या मंत्रिमंडळाचा सोलापूर येथे मुक्काम असणार आहे. तसंच उद्या ते आपल्या मंत्रिमंडळ आणि आमदार-खासदारांसह पंढरपूर रवाना होणार आहेत. पांडूरंगाचं दर्शन घेतल्यानंतर तुळजापूर येथे तुळजा भवानी मंदिरात देखील केसीआर हे आपल्या ताफ्यासह दर्शन घेणार आहेत. त्यापूर्वी भगरीथ भालके यांच्या गावात सरकोली येथे केसीआर शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी भालके हे त्यांच्या सहकाऱ्यांसह बीआरएसमध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत.

केसीआर यांचा पंढरपूर आणि तुळजापूर दौरा हा चर्चेचा विषय ठरत आहे. केसीआर यांनी ‘अबकी बार, किसान सरकार’ अशी घोषणा देत महाराष्ट्र पक्षविस्तार करायला सुरुवात केली आहे. त्यांनी नांदेड आणि हिंगोली येथून महाराष्ट्रात आपल्या पक्षाचा विस्तार करायला सुरुवात केली आहे. त्यानंतर त्यांनी व्हाया छत्रपती संभाजीनगर मार्गे नागपूरवर लक्ष केंद्रित केले आहे. राज्यातील अनेक माजी आमदार तसंच कार्यकर्ते बीआरएसमध्ये प्रवेश करताना दिसून येत आहेत. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना बीआरएसकडून मुख्यमंत्री पदाची जाहीर ऑफर देण्यात आली होती.

हे ही वाचा:

ओबीसीच्या मुद्यावरून फडणवीस आणि पवारांमध्ये हेवेदावे

Ashadhi Wari, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची सोलापुरात एन्ट्री, उद्या घेणार विठूमाऊलीचे दर्शन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version