शिवरायांच्या पुतळ्याबाबत कालीचरण महाराज म्हणाले, नरेंद्र मोदींनी माफी मागितली हा…

आता कालीचरण महाराज यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली, हा त्यांचा मोठेपणा असल्याचे कालीचरण महाराज म्हणाले आहेत. ते नाशिकमध्ये बोलत होते.

शिवरायांच्या पुतळ्याबाबत कालीचरण महाराज म्हणाले, नरेंद्र मोदींनी माफी मागितली हा…

सिंदुधुर्गातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली. या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माफीदेखील मागितली. आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर त्यांची पहिली प्रतिक्रिया ही दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (शुक्रवार, ३० सप्टेंबर) महाराष्ट्राच्या भेटीदरम्यान पालघरमधील वाधवन बंदराची पायाभरणी केली. यादरम्यान सिंधुदुर्गात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पडझड झाल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी माफी मागितली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी आराध्य दैवत आहेत, मी त्यांच्या चरणावर नतमस्तक होऊन माफी मागतो. जे शिवछत्रपतींचा आदर करतात, त्यांना पूजतात, त्यांचीही मी माफी मागतो, असे त्यांनी म्हटले. आम्ही ते लोक नाही जे भारताचे सुपुत्र वीर सावरकरांचा अपमान करतो, आमच्यावर ते संस्कार नाही, असे म्हणत पंतप्रधान मोदींनी माफी मागितली परंतु हे प्रकरण हळू हळू वाढतच चालले आहे. अश्यातच आता कालीचरण महाराज यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली, हा त्यांचा मोठेपणा असल्याचे कालीचरण महाराज म्हणाले आहेत. ते नाशिकमध्ये बोलत होते.

कालीचरण महाराज म्हणाले, शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला ही घटना वेदनादायक आहे. मुख्य नेत्याला दोषी धरण्यापेक्षा पुतळा बनवणारा 500% दोषी आहे. विरोधकांचं काम राजकारण करणे आहे. हिंदूंनी संघटित होणे हेच अंतिम काम आहे. हिंदूंना लढणे किंव्हा मारणे हाच पर्याय आहे. नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली हा त्यांचा मोठेपणा आहे.

पुढे बोलताना कालीचरण महाराज म्हणाले, संधी मिळाली तर नक्कीच राजकारणात येण्यास आवडेल. भारत हिंदु राष्ट्र म्हणून बनला पाहिजे हाच माझं प्रयत्न असेल. बांगलादेश आधी पाकिस्तानतही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. पाकिस्तानातील हिंदूंना मुसलमानांनी कापून टाकले. हिंदूंना जागृत व्हावे लागेल अन्यथा मुसलमान व्हावं लागेल.

Exit mobile version