उद्धव ठाकरेंच्या राजीनामा नंतर कंगनाची पहिली प्रतिक्रिया

सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर उद्धव ठाकरेयांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यानंतर बॉलिवूडची कंगना राणावतची प्रतिक्रिया आली आहे.

उद्धव ठाकरेंच्या राजीनामा नंतर  कंगनाची पहिली प्रतिक्रिया

सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर उद्धव ठाकरेयांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यानंतर बॉलिवूडची कंगना राणावतची प्रतिक्रिया आली आहे. कंगना व उद्धव ठाकरे सरकारमध्ये अगोदर पासून वाद होते हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. कंगनाच्या ऑफिसवर बीएमसीने बुलडोजर चालवला होता आणि या कारवाईमुळे संतापलेल्या कंगनाने उद्धव ठाकरे यांच्यावर राग व्यक केला होता. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर सर्वातआधी कंगनाची प्रतिक्रिया समोर आली आहे.कंगनाने तिच्या ऑफिशिअल इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ‘जब पाप बढ जाता है, तो सर्वनाश होता है और उस के बाद सृजन होता है,’ असं हा व्हिडीओ शेअर करताना लिहिलं आहे., ती म्हणते,1975 नंतर भारताच्या लोकशाहीचा सर्वात महत्त्वाचा काळ आहे.

1975 मध्ये लोकनेते जय प्रकाश नारायणच्या एका गर्जनेने सिंहासन कोसळलं होतं. 2020 मध्येच मी म्हटलं होतं की, लोकशाही एक विश्वास आहे. जे लोक सत्तेचा गर्व, अहंकार बाळगत जनतेचा विश्वास तोडतात, त्यांचं गर्वहरण निश्चित होतं. ही कुण्या व्यक्तिची शक्ती नाही. ही शक्ती आहे, एका सच्च्या चरित्राची. हनुमानजीला शिवाचा 12 वा अवतार मानलं जातं आणि जेव्हा शिवसेनाच हनुमान चालिसा बॅन करत असेल तर तुम्हाला शिव सुद्धा वाचवू शकत नाही. हर हर महादेव, जयहिंद, असं कंगनाने या व्हिडीओत म्हटलं आहे.असं म्हणत तिने उद्धव ठाकरे यांना टोमणा मारला आहे.तिचा हा व्हिडीओ पाहुन चाहते नाराज झाले आहेत.तुला काही कळत नाही,तू उगाच विषय वाढवते,तू आणि तुझे पिक्चर दोन्ही चालत नाही अशा अनेक कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.

कंगना अनेकदा असे व्हिडीओ करून प्रेक्षकांना उत्तर देत असते.तर आता या व्हिडीओ मुळे शिवसैनिक देखील तीच्यावर राग व्यक करत आहेत.कंगनाने, या अगोदर ‘अग्निपथ योजने’ची तुलना प्राचीन काळातील गुरुकुलाशी केली आहे. कंगनाने लिहिले, ‘जुन्या काळी सर्वजण गुरुकुलमध्ये जात असत. हे तसेच आहे, फक्त त्यांना पैसे मिळत आहेत. ड्रग्ज आणि PUBG मुळे उद्ध्वस्त होत चाललेली तरुणाईला याची गरज आहे. या योजनेसाठी सरकारचे कौतुक केले पाहिजे,अस ती म्हणतेय.

Exit mobile version