spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

फक्त अहंकारासाठी कांजूरचा आग्रह, फडणवीसांची ठाकरेंवर टीका

राज्यात शिंदे आणि फडणवीस सरकार आले. या सरकारने आल्या आल्या आरेमधील मेट्रा कारशेडवरील स्थगिती उठवली आणि त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाराजी ब्यक्त केली होती.

मुंबई :- राज्यात शिंदे आणि फडणवीस सरकार आले. या सरकारने आल्या आल्या आरेमधील मेट्रा कारशेडवरील स्थगिती उठवली आणि त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाराजी ब्यक्त केली होती. आमच्यावरील राग मुंबईवर काढू नका… अशी विनंती करत उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली होती. परंतु त्यापाठोपाठ राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री देवेब्दर फडणवीस यांनी त्यांना प्रतिउत्तर दिले आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लक्ष केंद्रित केले असून फक्त अहंकारासाठी कांजूरचा आग्रह करण्यात आला होता अशी टीका केली आहे. तसेच माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी एक आश्वासनही दिले आहे, आरेमध्ये कारशेडसाठी एकही झाड कापणार नसल्याचं आश्वासनही त्यांनी दिलं आहे. “मेट्रो कारशेडसाठी आरेमध्ये एकही झाड कापायची गरज नाही. कारशेडचे २९ टक्के आणि एकूण प्रकल्पाचे ८५ टक्के काम पूर्ण झालं आहे. त्यामुळे चार वर्ष प्रकल्प थांबवून १५-२० हजार कोटी रुपयांनी किंमत वाढवणे योग्य नाही. हे जनतेच्या खिशातील पैसे असून अशा पद्धतीने आम्ही वाया जाऊ देणार नाही,” असंही त्यांनी सांगितलं. तसेच ते पुढे म्हणाले, “मला वाटतं की त्यांनी (उद्धव ठाकरे) फक्त अंहकारासाठी कांजूरमार्गची मागणी केली. आम्हीदेखील वारंवार कांजूरची जागा रिकामी असती, तिचा वाद नसता तर खर्च करुनही कारशेड तिथे नेलं असतं. पण तिथे वाद सुरु आहे,” असं फडणवीस म्हणाले.

“कांजूरमार्गची जागा एका डेपोसाठी आधीपासूनच मागितली गेली आहे. मात्र त्या जागेवरुन वाद सुरु असून, हायकोर्टात प्रकरण सुरु आहे. मेट्रो कारशेडची जागा मेट्रो तीनसाठी मागितलेली आहे. तर कांजूरमार्गची जागा मेट्रो सहासाठी मागितली आहे. कांजूरमार्गची जागा मेट्रो तीनसाठी योग्य नाही असा अहवाल आमच्या काळातील कमिटीनेही केला होता. तसंच उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना एसीएस सौनिक यांची उच्चस्तरीय समिती तयार केली होती, त्यांनीही कारशेडसाठी आरेमधील जागाच योग्य असल्याच स्पष्ट केलं होतं. ते कांजूरमार्गमध्ये नेलं तर प्रचंड खर्च वाढेल आणि चार वर्षांचा उशीर होईल असं समितीने सांगितलं होतं,” असे फडणवीस यांनी सांगितले.

हे ही वाचा :-

विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदावरून, महाविकास आघाडीत मतभेद

Latest Posts

Don't Miss