spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Maharashtra Assembly Winter Session 2022 ‘कर्नाटक सरकार मुजोरी करतंय, महाराष्ट्र सरकार कुंभकर्णासारखं घोरतंय’, मविआ आक्रमक

हिवाळी अधिवेशनच्या पहिल्या आठवड्याचा आज शेवटचा दिवस आहे. गुरुवारी सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांचे निलंबन करण्यात आले. जयंत पाटील (Jayant Patil) यांचं निलंबन, कर्नाटक सीमावाद (Maharashtra Karnataka Border Dispute) आणि दिशा सालियन प्रकरणावरून यंदाचं हिवाळी अधिवेशन (Maharashtra Winter Session) चांगलंच तापलंय.

Maharashtra Assembly Winter Session 2022 : हिवाळी अधिवेशनच्या पहिल्या आठवड्याचा आज शेवटचा दिवस आहे. गुरुवारी सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांचे निलंबन करण्यात आले. जयंत पाटील (Jayant Patil) यांचं निलंबन, कर्नाटक सीमावाद (Maharashtra Karnataka Border Dispute) आणि दिशा सालियन प्रकरणावरून यंदाचं हिवाळी अधिवेशन (Maharashtra Winter Session) चांगलंच तापलंय. विरोधक आज सभागृहात न जाता विधिमंडळाबाहेर आंदोलन करणार आहेत. विधानसभेच्या कामकाजात विरोधक सहभागी होणार नाहीत,असा निर्णय महाविकास आघाडीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली आहे. फडणवीस सरकारने आवाज दाबण्यासाठी आमदार जयंत पाटील यांच्यावर केलेली कारवाई आणि कर्नाटक सरकारविरोधात आज महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक झाले असून विधानभवनाच्या पायर्‍यांवर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाच्या (Maharashtra Karnataka Border Dispute) मुद्द्यावर महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) आमदार कर्नाटक तसंच शिंदे सरकारच्या विरोधात चांगलेच आक्रमक झाले. विधानभवनाच्या पायर्‍यांवर उतरत जोरदार घोषणाबाजी केली तसंच काळ्या पट्ट्या बांधून आमदारांनी निषेध केला. “बेळगाव कारवार आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे…”, “बेळगाव कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे…”, “सरकार हमको दबाती कर्नाटक को घबराती है…”, “कुंभकर्णाने घेतलं झोपचं सोंग तिकडे कर्नाटक सरकार मारतंय बोंब…,” “कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध…”, “लोकशाहीचा खून करणार्‍या सरकारचा धिक्कार असो…,” कर्नाटक सरकार मुजोरी करतंय, महाराष्ट्र सरकार कुंभकर्णासारखं घोरतंय…”, “सीमा प्रश्नी भूमिका घ्या नाहीतर खुर्च्या खाली करा…”, “भूखंडाचा श्रीखंड खाणार्‍या मुख्यमंत्र्यांचा धिक्कार असो…”, अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला. काळ्या पट्टया बांधून महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत ईडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली..

 

View this post on Instagram

 

A post shared by Time Maharashtra (@timemaharashtra)

 शिंदे – फडणवीस सरकारने आवाज दाबण्यासाठी आमदार जयंत पाटील यांच्यावर केलेली कारवाई आणि कर्नाटक सरकारविरोधात आज महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक झाले असून विधानभवनाच्या पायर्‍यांवर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. कर्नाटक सरकारचा निषेध करतानाच आमदार जयंत पाटील यांच्यावर झालेल्या कारवाई संदर्भात आज महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक झाले असून सभागृहात न जाता पायर्‍यांवर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे आमदार पायर्‍यांवर आंदोलन करत आहेत.

दरम्यान, भाजपच्या आमदार आणि विद्यमान विधानसभा सदस्य मुक्ता टिळक यांचे गुरुवारी निधन झाले. त्यामुळे, आज विधानसभेत त्यांना श्रद्धांजली वाहून आजचे विधानसभा कामकाज बंद ठेवण्यात येत असल्याची माहिती आहे. मात्र, तत्पूर्वीच विरोधक कर्नाटक सीमावादाच्या प्रश्नावरुन आक्रमक झाल्याचे दिसून आले. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही आक्रमक पवित्रा घेत माध्यमांसमोर भूमिका मांडली.

हे ही वाचा:

Maharashtra Assembly Winter Session 2022 आज विधानसभेच्या कामकाजात विरोधकांचा सहभाग नाही, महाविकास आघाडीच्या बैठकीत घेतला निर्णय

Yuzvendra Chahal and Dhanashree Anniversary स्टार फिरकीपटू युझवेंद्र चहलच्या लग्नाला आज २ वर्ष पूर्ण, पहा हे खास फोटो

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss