spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Kedar Dighe Exclusive : हा एकमेव असा नेता होता कि त्यांनी स्वार्थ कधी बघितला नाही – केदार दिघे

आज दि. १९ नोव्हेंबर २०२२ रोजी शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांची विशेष मुलाखत हि टाईम महाराष्ट्र तर्फे घेण्यात आली.

आज दि. १९ नोव्हेंबर २०२२ रोजी शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांची विशेष मुलाखत हि टाईम महाराष्ट्र तर्फे घेण्यात आली. यावेळी धर्मवीरांचा गड केदार दिघे राखणार का? या मुख्य मुद्द्याला अधोरेखित करून हि संपूर्ण मुलाखत घेण्यात आली आहे. यावेळी धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी अनेक गोष्टींचा उलगडा केला आहे.

हे ही वाचा : Kedar Dighe Exclusive : आनंद दिघेंचा राजकीय वापर नक्की कोण करतंय ?; केदार दिघे म्हणाले …

आता शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख पदाची सर्व सूत्र आणि जबाबदारी हि केदार दिघेंकडे आली आहे या संदर्भात त्यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, शिवसेनेतून अनेक लोक हे सोडून गेले हे अत्यंत दुर्दैव्य आहे. ठाण्यात ज्या दिघें साहेबांचे विचार घेऊन त्यांची कार्यपद्धती पाहून त्या अनुषंगाने शिवसेना ज्या पद्धतीने वाढली त्यानंतर अश्या पद्धतीची दुफळी वाजणं हे अत्यंत दुर्दैव्य आहे असे केदार दिघे म्हणाले आहे. तसेच ते पुढे म्हणाले, माझ्यावर उद्धव ठाकरे यांनी जी जबाबदारी दिली आहे ती योग्य पद्धतीने पार पाडणं हे माझं कर्तव्य आहे. परंतु आता विस्कळीत झालेली घडी पुन्हा एकदा बसवणं हे नक्कीच एक आव्हानात्मक आहे. ज्या पद्धतीने ठाण्यामधून लोकांचा जो काही प्रतिसाद मिळत आहे, जो सकारात्मक उद्देश जाणवतो त्यामुळे नक्कीच याला यश मिळेल असे केदार दिघे म्हणाले आहे.

स्वर्गीय आनंद दिघे याना जाऊन २० वर्षांपेक्षा जास्त काळ आता झालं आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंना याना आता शिवसेनेची जागा ठाण्यात अजून भक्कम करण्यासाठी दिघेंच्याच वाट्याला जावं लागत आहे. या बाबत प्रश्न विचारला असता केदार दिघे यांनी एका वाक्यात उलगडेल असं उत्तर दिले आहे. एकमेव असा नेता होता कि त्यांनी स्वार्थ कधी बघितला नाही असे केदार दिघे म्हणाले आहे. त्याचसोबत ते पुढे ते म्हणाले , आनंद दिघे यांनी सर्व आयुष्य हे संघटनेसाठी वेचलं, जनतेच्या प्रश्नांसाठी सर्व उभं आयुष्य वेचलं. तसेच त्यांनी कधीच निवडणूक देखील नाही लढवली. त्यांचा उद्धेश हा एकच होता कि आमचा पक्ष हा वाढावं. या पक्षाच्या नेतृत्वाला म्हणजेच बाळासाहेबांना ते दैवत समजत होते. त्यांच्या प्रति प्रचंड आस्था आणि निष्ठा देखील होती. आणि शेवटच्या श्वासापर्यंत ते संघटनेसोबत राहिले आहे. असा निस्वार्थी माणूस जेव्हा असं कार्य करून जातो तेव्हा त्याच नाव अजरामर राहत असं मला वाटत असं केदार दिघे म्हणाले आहेत. अश्या प्रकारे टाईम महाराष्ट्राच्या मुलाखतीच्या माध्यमातून अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.

हे ही वाचा :

Time Maharahstra Exclusive : धर्मवीरांचा गड केदार दिघे राखणार का?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss