spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

गुवाहटीच्या वाटेवर लक्ष ठेवा, कुछ तो गडबड है…अजित पवार नाराज? काळेंच्या ट्विटमुळे चर्चा

गंभीर आजारपण असतानाही शरद पवार (Sharad Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) शिर्डी येथील मंथन शिबीरात यांनी लावलेली उपस्थिती गेले.

गंभीर आजारपण असतानाही शरद पवार (Sharad Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) शिर्डी येथील मंथन शिबीरात यांनी लावलेली उपस्थिती गेले. अवघ्या महाराष्ट्रासाठी ही उपस्थिती लधवेधी ठरली. यापेक्षाही जास्त लक्ष वेधून घेतलं ते अजित पवार यांच्या अनुपस्थितीने. हाच मुद्दा पकडत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते गजानन काळे (Maharashtra Navnirman Sena leader Gajanan Kale) यांनी एक महत्त्वाचं ट्विट केलं आहे.

अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज असल्याच्या चर्चा वारंवार घडत असतात. आजचं हे चित्र अधिक बोलकं आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काहीतरी गडबड आहे, असं सांगणारं असल्याचं ट्विट गजानन काळे यांनी केलंय.

गजानन काळे यांनी ट्विट केलंय. ते म्हणाले, ‘आदरणीय पवार साहेब तब्येत ठीक नसतांना राष्ट्रवादीच्या शिबिरात येतात व अजितदादा बरोबर त्याच वेळी वैयक्तिक कारण सांगून अनुपस्थित राहतात. ही बाब काही पचनी पडत नाही. तसेही दादा विरोधी पक्षनेते म्हणून शांत आहेत काही दिवसांपासून…. गुवाहाटीच्या रस्त्यावर लक्ष ठेवून रहा रे. कूछ तो गडबड हैं.

 आपल्या पक्षात नाराज असलेले आमदार आणि गुवाहटीच्या वाटेवर हे जणू राज्यातील राजकारणात बंडखोरीचे संकेत देणारं समीकरण बनलंय.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या एवढ्या मोठ्या मेळाव्यात शरद पवार प्रकृती अस्वास्थ्यामुळे गैरहजर राहतील, असं म्हटलं जात होतं. मात्र न्यूमोनिया झाला असताना, हाताचे बँडेज घेऊन शरद पवार थेट हेलिकॉप्टरने शिर्डीत पोहोचले. पाचच मिनिटं भाषण करून पुन्हा रुग्णालयात दाखल झाले. शिर्डीतील मंथन शिबीरात राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणुकीत मिशन १०० चा नारा दिला आहे. शिबिरात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आदी दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली.

मात्र अजित पवारांच्या गैरहजेरीमुळे मोठी चर्चा सुरु झाली आहे. त्यातच शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीच्या चर्चा सुरु आहेत. शिंदे शरद पवार यांना भेटायला गेल्याचेही अनेक राजकीय अर्थ निघू लागलेत. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस काँग्रेसच्या आमदारांच्या संपर्कात असल्याचं म्हटलं जातंय. अजित पवार यांचा आजच्या तारखेला दुसरा नियोजित कार्यक्रम फार पूर्वीच ठरला होता. त्यामुळे माझ्या परवानगीनेच ते येथे गैरहजर राहिल्याचं स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी दिलंय. तरीही ८१ वर्षांचे शरद पवार एवढे आजारी असताना शिबीरात पोहोचले अन् अजित पवारांना एखादा कार्यक्रम पुढे-मागे का करता आला नाही, हा प्रश्न अवघ्या महाराष्ट्राला पडलाय.

हे ही वाचा :

By Election Result : ६ राज्यांतील ७ विधानसभांसाठीच्या पोटनिवडणुकीचा आज निकाल

Andheri Bypoll Result : गुलाल कोणाचा? अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss