spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

खडसेंनी दिले ठाम उत्तर, भाजप प्रवेशाच्या चर्चांना…

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे भाजप मध्ये जाणार अश्या अनेक चर्चा रंगत होत्या आणि अखेर या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे भाजप मध्ये जाणार अश्या अनेक चर्चा रंगत होत्या आणि अखेर या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. “मी भाजपात जाणार नाही, मी राष्ट्रवादीतच राहणार, असा पुनरुच्चार राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Senior leader of NCP, Eknath Khadse) यांनी केला आहे. ते बुलढाण्यात (Buldhana) बोलत होते.

जर येणाऱ्या काळात विरोधी पक्ष विखुरलेले अवस्थेत राहिला तर त्याचा फायदा हा भाजपाला होऊ शकतो आणि तस कारस्थान भाजपाकडून सुरु असल्याची शक्यता नाकारता येत नाही, असा गंभीर आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे. एकेकाळी भाजपचे दोन खासदार असताना भाजपला हिणवलं जायचं. त्यावेळी आम्ही मोठ्या मेहनतीने पक्ष वाढवला. तर बनिया, ब्राह्मणांचा पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाजपला गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, एकनाथ खडसे यांच्यामुळे बहुजनांचा पक्ष म्हणून ओळख मिळाली असल्याचंही खडसे यांनी म्हटलं आहे.

एकनाथ खडसेंनी यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली असल्याचा दावा मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला होता. एकनाथ खडसे आणि त्यांच्या स्नुषा तसंच भाजप खासदार रक्षा खडसे हे अमित शाहांच्या भेटीसाठी दिल्लीत गेल्याची चर्चा रंगली होती. तसंच एकनाथ खडसे हे आगामी काळात पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करु शकतात, असाही अंदाज व्यक्त केला जात होता. परंतु आपण भाजपमध्ये जाणार नाही, राष्ट्रवादीतच राहणार असं ठाम उत्तर एकनाथ खडसेंनी दिल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

एकेकाळी एकनाथ खडसे हे महाराष्ट्रातील भाजपचा चेहरा होते. २०१४ मध्ये ते मुख्यमंत्रीपदाचे दावेदार देखील समजले जात होते. परंतु गेल्या काही वर्षांपासून एकनाथ खडसे हे भाजपात नाराज असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. अखेर एकनाथ खडसे यांनी शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. “माझा खूप छळ झाला, किती अपमान झाला तरीही मला पक्ष सोडायचा नव्हता. परंतु त्यांनी अशी परिस्थिती निर्माण केली की शेवटी मला पक्ष सोडावा लागला,” असं म्हणत एकनाथ खडसे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

हे ही वाचा :

MNS : मनसे नेत्याचे ऋतुजा लटकेंसाठी एक ट्विट चर्चेत म्हणाले, वहिनींनी शिवसेनेचा डाव ओळखावा इतकच…

कर्नाटकातील शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदीबाबत सर्वोच्च न्यायालय आज निकाल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss