spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

खैरे हे महिलांना रात्री फोन करायचे आणि बघा आम्हाला मतदान केले नाही तर… – संजय शिरसाट

शिवसेना फुटीनंतर दोन्ही गट आपसात भिडल्याच दिसत आहे. काल निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि चिन्ह गोठवल्यानंतर दोन्ही गटात आरोप प्रत्यारोप चालू आहे. औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांनी शिवसनेचे नेते चंद्रकांत खैरे यांच्यावर ग्रामपंचायत निवडणूकबाबत गंभीर आरोप केले आहेत. खैरे हे प्रत्येक महिलांना रात्री बारा-एक वाजता फोन करायचे आणि बघा आम्हाला मतदान केले नाही तर काय होईल असे सांगायचे, असा आरोप संजय शिरसाट यांनी केला आहे.

चंद्रकांत खैरे आजकाल थोडे पागल झाले आहेत. त्यांना सुद्धा वाटायला लागले आहे की, रोज सकाळी उठल्यावर आपली सुद्धा कोणीतरी बाईट घेतली पाहिजे. तसेच बाईट देतांना असे काही विधान करायला पाहिजे की सगळीकडे आपली चर्चा व्हायला पाहिजे. त्यामुळे हे मूर्खपणाचे लक्षण आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे २४ तास काम करत असल्याने याचे दुःख त्यांना वाटत आहे. शिंदे यांचा असाच वेग असल्यास आपलं काय होईल अशी चिंता त्यांना लागली आहे. सत्तांतरानंतर औरंगाबाद जिल्ह्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत सर्वात मोठी ग्रामपंचायत निवडणूक मी जिंकून दाखवली. यावेळी खैरे काय करायचे तर, प्रत्येक महिलांना रात्री बारा-एक वाजता फोन करायचे आणि बघा आम्हाला मतदान केले नाही तर काय होईल असे सांगायचे, असा आरोप संजय शिरसाट यांनी केला आहे.

खैरे यांना उद्धव ठाकरे यांच्यासमोर आपलं वजन वाढवायचं आहे. आम्ही दोघांनी सोबत मराठवाड्यात शिवसेना आणली आहे. आज त्यांना मातोश्रीवर कोणी विचारत नसून, त्यांचे हेच अवघड दुखणं आहे. त्यामुळे त्यांनी आज बडबड केली नाहीतर तर ते कचऱ्याच्या डब्यात जातील. खैरे यांचे विरोधक असलेले अंबादास दानवे तर विरोधी पक्षनेते झाले. पण खैरे यांचे पुनर्वसन कसे होणार. म्हणून काहीतरी विधान करून प्रसिद्धीत राहण्याचा खैरे यांचा प्रयत्न सुरु असतो, असे शिरसाट म्हणाले.

हे ही वाचा:

Uddhav Thackeray Live : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे लाईव्ह

‘… म्हणजे हे न्यायाधीश झाले आहेत का ?’ , अरविंद सावंत यांची टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss