नोएडातील टॉवर पडल्यानंतर मुंबईतील अनधिकृत इमारतींच काय ?, किरीट सोमय्यांचा सवाल

नोएडातील टॉवर पडल्यानंतर मुंबईतील अनधिकृत इमारतींच काय ?, किरीट सोमय्यांचा सवाल

गेल्या आठ दिवसांपासून ज्या नोएडा सुपरटेक ‘ट्विन टॉवर’ चर्चा सुरू होती. आता ते टॉवर इतिहासजमा झाला आहे. हे ट्विन टॉवर काल (२८ ऑगस्ट २०२२) रोजी अवघ्या १२ सेकंदात जमीनदोस्त झाला आहे. १२ सेकंदात ३०० कोटी उद्धवस्त झाले आहेत. तर आज भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत मुंबईतील अनधिकृत इमारती व इमारतीवरील बेकायदेशीर वाढवलेले मजले याविषयी संवाद साधला.

हेही वाचा : 

भारताच्या विजयानंतर सोशल मीडियावर शुभेच्छाचा वर्षाव, तर शरद पवारांचा व्हिडिओ होतोय व्हायरल

किरीट सोमय्या काही दिवसांपासून करोनाकाळात दिलेल्या वेगवेगळ्या कंत्राटांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत होते. संजय राऊत यांचे व्यवसायातील भागीदार आणि मित्र सुजित पाटकर यांनी मुंबईतील वेगवेगळ्या जम्बो करोना केंद्रात जून २०२० ते मार्च २०२२ या कालावधीत वैद्यकीय सेवा पुरविण्याकरिता काढलेल्या निविदा मिळविण्यासाठी ‘लाइफलाइन रुग्णालय मॅनेजमेंट सर्व्हिसेस’ ही कंपनी स्थापन केली. ही कंपनी अस्तित्वात नसून केवळ कंत्राट मिळविण्यासाठी बनावट कागदपत्रांद्वारे तयार करण्यात आली आहे, असा आरोप सोमय्या यांनी केला. त्याचबरोबर सुजित पाटकर पळून जाण्यापूर्वी त्यांचा पासपोर्ट पोलिसांनी जप्त करावा आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी किरीट सोमय्या यांची आहे.

महागाईचा भडका ! १ लीटर दुधासाठी मोजावे लागणार ८० रुपये

Exit mobile version