जेलमध्ये टाकण्याची धमकी देणारे आज स्वत:च जेलमध्ये ; किरीट सोमय्या

जेलमध्ये टाकण्याची धमकी देणारे आज स्वत:च जेलमध्ये ; किरीट सोमय्या

मुंबई : काल पत्राचाळ आर्थिक घोटाळा प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी ईडीच्या पथकाने धाडटाकली होती. दिवसभर राऊतांची चौकशी करण्यात आली असून अखेर राऊतांना रविवारी मध्यरात्री उशिरा ईडीने अटक केले. राऊतांवर करण्यात आलेल्या या कारवाईचे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी स्वागत केले. व संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली आहे.

“माफिया संजय राऊत यांना आता हिशोब द्यावा लागणार”, ‘अनेकांना जेलमध्ये टाकण्याची धमकी देणारे संजय राऊत आज स्वत:च जेलमध्ये आहेत. सत्यमेव जयते’ असे सोमय्यांनी आपल्या ट्विटर हेन्डेल वरून ट्विट करत म्हटले आहे.
पुढे सोमय्या म्हणाले, “संजय राऊत यांची जागा नवाब मलिक यांच्या शेजारीच असावी अशी राज्यातील साडेबारा कोटी जनतेची इच्छा आहे. राऊत हे परदेशात कुटुंबासह फिरायला जात होते. त्याचा पैसा आला कुठून? त्यांचे हॉटेलचे बिल कोण देत होते?, असेही प्रश्न किरीट सोमय्या यांनी उपस्थित केले.

हेही वाचा : 

8 वाजताचा ‘भोंगा’ आता बंद, मुख्यमंत्र्यांचा राऊतांना टोला

Exit mobile version