spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मढमधील कथित स्टुडिओ घोटाळा प्रकरणी, किरीट सोमय्या यांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि अस्लम शेख यांच्यावर मढमधील कथित स्टुडिओ घोटाळा प्रकरणी गंभीर आरोप केला आहे. आज किरीट सोमय्या मढ येथे जाऊन कथित स्टुडिओच पाहणी केली. नियमात बसत नसताना देखील आदित्य ठाकरे आणि अस्लम शेख यांनी मुंबईचे पालकमंत्री असताना या स्टुडिओच्या बांधकामाला कशी परवानगी दिली आणि त्यातून स्टुडिओचं व्हॅल्युएशन असलेल्या एक हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा दावा किरीट सोमय्यांनी केला आहे.

संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एकत्र येणार

स्मशानभूमीला नकार देत स्टुडिओ उभारणी

मढ परिसराला समुद्र किनारा लागून आहे. तिथे मोठ्या प्रमाणात मासेमारी करणाऱ्या ( कोळी ) लोकांची वस्ती आहे. तिथल्या स्थानिकांनी परिसरात स्मशानभूमी बांधण्याची मागणी केली होती परंतु त्या ठिकाणी कोरोना काळानंतर स्टुडिओ उभारण्यात आला. या बाबत किरीट सोमय्या यांनी प्रश्न उपस्थित केले आहे. त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले, “आदित्य ठाकरे आणि अस्लम शेख यांच्या १ हजार कोटींच्या घोटाळ्याचं प्रात्याक्षिक आपण बघत आहोत. कोणत्याही पर्यावरण कायद्यात, सीआरझेड कायद्यात सीआरझेड एक, दोन विकास क्षेत्रात अशा बांधकामाची परवानगी देता येत नाही. जुलै २०२१ मध्ये आदित्य ठाकरे आणि अस्लम शेख यांनी या जागेला भेट दिली होती. इथल्या २८ स्टुडिओंच्या बांधकामाचं मूल्यांकन एक हजार कोटी इतकं आहे. त्यावेळी परवानगी संपली होती. पण आदित्य ठाकरे आणि अस्लम शेख या दोघा मुंबईच्या पालकमंत्र्यांनी दादागिरी केली. भ्रष्टाचारी पद्धतीने जुलै २०२१मध्ये तात्पुरती परवानगी संपल्यानंतर देखील हे बांधकाम तोडलं नाही”, असं किरीट सोमय्या यावेळी म्हणाले.

टेक्सासमध्ये ‘आय हेट यू इंडियन्स’ म्हणत, अमेरिकन महिलेनं भारतीय महिलेला दाखवली बंदूक

पुढे सोमय्या म्हणाले, “या बांधकामाला बेकायदेशीर असल्याची नोटीस देऊन एक महिना झाला. अद्यापही जिल्हाधिकारी निधी चौधरी, आणि महापालिकेचे अधिकारी करतायत काय? इथे बांधकाम तोडलं नाही तर त्यावर दुसरा मजलाही बांधला. त्यामुळे मी महापालिका अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना आणि पर्यावरण सचिवांना इशारा देतोय. महाविकास आघाडीच्या कामात त्यावेळी तुम्ही भ्रष्टाचार केला असेल. पण आता ते दिवस संपले आहेत. आता कोणते स्टुडिओ चालणार आणि कोणते रिसॉर्ट्स चालणार नाही’, असे म्हणत आदित्य ठाकरेसह अनिल परब यांना नकळत चिमटा काढला आहे.

हेही वाचा : 

बॅडमिंटन खेळताना हृदयविकाराचा झटका आल्याने तरुणाचा जागीच मृत्यू

Latest Posts

Don't Miss