Nashik Teachers Constitutiecy: Sushma Andhare यांचा पैसे वाटल्याचा गंभीर आरोप; Kishor Darade यांचे प्रत्युत्तर

महायुतीचे उमेदवार समोरासमोर लढल्यास महायुतीला फटका बसण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे (Vivek Kolhe) यांनी देखील विजयासाठी कंबर कसली असून जोरदार आरोप प्रत्यारोपाचे वारे वाहत आहेत. त्यामुळे अपक्ष उमेदवारामुळे महायुतीला अधिक धोका निर्माण होऊ शकतो अशी शक्यता आहे.

Nashik Teachers Constitutiecy: Sushma Andhare यांचा पैसे वाटल्याचा गंभीर आरोप; Kishor Darade यांचे प्रत्युत्तर

नाशिक शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी जोर लावून आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यातं आल्याने पक्षातील नेत्यांची चांगलीच तयारी सुरु आहे. काल २२ जून रोजी नाशिक मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी शिवसेनेचे उमेदवार किशोर दराडे (Kishor darade) यांच्यासाठी नाशिक, जळगाव,शिर्डी असा दौरा केला.मात्र या सभेनंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी जिल्ह्यातील आलेले प्रत्येक शाळेचे शिक्षक, कर्मचाऱ्यांना पैसे वाटल्याचा आरोप मुख्यमंत्र्यावर केला पण त्यांच्या आरोपावर किशोर दराडे यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. 

शिंदेच्या सेनेचे उमेदवार किशोर दराडे (Kishor darade) यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांनी कंबर कसली आहे.काल झालेल्या सभेनंतर,ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर व्हिडिओ पोस्ट करत त्यावर असं म्हणाल्या की, महायुतीचे उमेदवार दराडे यांच्या प्रचार्थ मुख्यमंत्री यांची जळगावातील आदित्य लॉन्स येथे सभा झाली. सभेनंतर जिल्ह्यातील आलेले प्रत्येक शाळेचे शिक्षक, कर्मचारी, मुख्याध्यापक, संस्थाचालक यांना पैसे वाटप करण्यात आले. कुठाय निवडणूक आयोग? ” असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांसह शिंदेंच्या शिवसेनेवर टीका केली. अंधारेंच्या ट्विटनंतर राजकीय वातावरण तापलं.

 

शिंदेच्या सेनेचे उमेदवार किशोर दराडे (Kishor darade)यांनी सुषमा अंधारेंनी केलेल्या ट्विटवर प्रत्युत्तर देत म्हणाले की, “आरोप करणाऱ्यांची मला कीव वाटते.इतक्या मोठ्या सभेमध्ये असं कोणी पैसे वाटणार का ?पैसे वैगरे काही वाटले नाहीत. यांच्याकडे काही मुद्दे नाहीत म्हणून खोटे आरोप करत आहेत.” अशा शब्दात किशोर दराडे (Kishor darade) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

पुढे ते म्हणाले की, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सगळ्यांसाठी महत्त्वाचे आहेत. त्यांनी शिक्षकांसाठी ११६० कोटी रुपये दिले आहेत. शिक्षकांची चूल मुख्यमंत्र्यांमुळे पेटली आहे. अनेक धाडसी निर्णय या मुख्यमंत्र्यांनी घेतले आहेत. मराठी भाषा ही कशी ही वळते त्यामुळे त्याचा गैरसमज करुन घेऊ नये. अशी विनंती देखील दराडे यांनी त्यावेळी केली. 

दरम्यान, महायुतीत दोन प्रमुख पक्षाकडून उमेदवार देण्यात आल्याने नाशिक शिक्षक पदवीधरसाठी महायुतीच आमनेसामने आली आहे. किशोर दराडे(Kishor darade) हे शिंदेंच्या सेनेचे उमेदवार असून राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar) गटाचे अॅंड.महेंद्र भावसार (Mahendra Bhavsar) हे उमेदवार आहेत आणि महायुती विरोधात ठाकरेंच्या सेनेचे संदीप गुळवे(Sandip gulve) हे मैदानात उतरले आहेत. महायुतीचे उमेदवार समोरासमोर लढल्यास महायुतीला फटका बसण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे (Vivek Kolhe) यांनी देखील विजयासाठी कंबर कसली असून जोरदार आरोप प्रत्यारोपाचे वारे वाहत आहेत. त्यामुळे अपक्ष उमेदवारामुळे महायुतीला अधिक धोका निर्माण होऊ शकतो अशी शक्यता आहे.

हे ही वाचा

सुदृढ नागरिक ही राज्याची संपत्ती, म्हणून…INTERNATIONAL YOGA दिनी CM Shinde यांचे आवाहन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

 

Exit mobile version