spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

नवे चिन्ह आणि नव्या नावावर किशोरी पेडणेकर आणि सुष्मा अंधरेंची प्रतिक्रिया

निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर सुष्मा अंधारे आणि किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया आलेली आहे.

उद्धव ठाकरे यांच्या गटाला आता नवं नाव आणि नवं चिन्ह मिळालं आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव देण्यात आलं आहे. तर मशाल हे चिन्ह त्यांना देण्यात आलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासमोर मशाल हे चिन्ह घरोघरी पोहोचवण्याचं आव्हान असणार आहे. त्यावर आता नव्या नावावर आणि चिन्हावर उध्दव ठाकरेंच्या गटातून प्रतिक्रिया येत आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर सुष्मा अंधारे आणि किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया आलेली आहे.

 

उद्धव ठाकरे यांच्या गटातील किशोरी पेडणेकर यांनी मिळालेले चिन्ह मशाल आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव मिळाल्यामुळे आनंद व्यक्त केला आहे. काळरात्र होता होता उषःकाल झालं अरे शिवसानिकांनो पेटवा आयुष्याच्या मशाली आपल्याला उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव मिळालं आहे. आपला विजय झालेला आहे. देवदेवतांचं चिन्ह मशाल आपल्याला मिळालं आहे. आणि हे चिन्ह ज्यांनी आपल्याला पक्षात काळरात्र करण्याचा प्रयत्न केलाय त्यांचा उषःकाल आता सुरू झालाय. त्यामुळे आता शिवसैनिकांनो आता आयुष्याच्या पेटवा मशाली आणि दाखवून द्या की ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंची ही मशाल आहे.

तर शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी फडणवीस आणि शिंदे यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. शिवसेनेचे हात कधीही थरथरले नाहीत. भाजपा आणि मोदी शाहंमुळे शिंदे गटाला अजूनही धनुष्यबाण मिळू शकतो. स्त्तेत आलेल्या पक्षांमुळे आता राजकारणात यंत्रणांचा आधीच गैरवापर सुरू झाला आहे. आता शिंदेगतला कोणतं चिन्ह मिळावं असं विचारलं असता त्या आम्हाला काहीच वाटत नाही आम्ही बोलतो ते उगढ अस्त, असं सुष्मा अंधारे यांनी म्हटलं आहे.

 

हे ही वाचा:

उद्धव ठाकरे गटाची नावावर आणि चिन्हावर प्रतिक्रिया; उषःकाल होता होता, काळरात्र झाली, आता आयुष्याच्या पेटवा मशाली

नवे चिन्ह आणि नव्या नावावर किशोरी पेडणेकर आणि सुष्मा अंधरेंची प्रतिक्रिया

आमचं म्हणणं ऐकून घेतल्याशिवाय निर्णय देऊ नका; शिंदे गटाची कोर्टात धाव

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss