किशोरी पेडणेकर दसरा मेळाव्यातून थेट..

ज्याच्यावर विश्वास टाकला त्यानेच विश्वासघात केला, पक्षात फूट पडली, घराला आग लावली,

किशोरी पेडणेकर दसरा मेळाव्यातून थेट..

किशोरी पेडणेकरांनी कार्यकर्त्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा देत आणि छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून आणि प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आदरांजली वाहून त्यांनी त्याच्या भाषणाला सुरुवात केली. आपल्या भाषणाची सुरुवात करताच किशोरी पेडणेकरांनी शिंदे गटाला जोरदार टोला लगावलाय त्या म्हणल्या महाराष्ट्रात तीन मेळावे भरलेयत पहिला म्हणजे परंपरेने भरणार मेळावा पंकजा मुंडेंचा मेळावा दुसरा मेळावा म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचा मेळावा आणि तिसरा मेळावा म्हणजे तो मेळावा जिथे गर्दी गोळा केली जातेय. माणसं स्वतःहून येणं आणि माणसं आणली जाणं यात खूप फरक आहे आणि तो प्रत्येकजण पाहतोय. बसमधून माणसं भरून आणली जातायत आणि महाराष्ट्राची दिशाभूल केली जातेय, असाही त्या यावेळी म्हणाल्या.

मुंबई महानगरपालिका गेली अनेक वर्ष काम करत असलेल्या विश्वासामुळे काय होत हे येत्या निवडणुकीमध्ये कळेलच, असा इशाराही किशोरी पेडणेकरांनी दिला. सगळीकडे पैश्याचे राजकारण सुरु आहे. महामंडळाचा पैसे देऊन अचानक कुणीतरी त्यांचा गल्ला भरलाय, असा दावा किशोरी पेडणेकरांनी केलाय. २००२ पासून आम्ही महानगरपालीका पाहतोय पण सॊबत राहायचं मैत्रीची भाषा करायची आणि मग दगा द्यायचं हे काम भाजपाने केलय असाही त्या म्हणाल्या आहेत.

कोविड काळात अनेक कामे केली आणि जगणे आणि देशाने सगळ्यांनी दाखल घेतली आणि हीच विरोधी गटासाठी खरी पोटदुखी ठरली. देशात अव्वल मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंची गणना झाली म्हणून विरोधकांच्या पायाखालची माती सरकली आणि मग शोवसेनेला त्यांनी ईडीच्या सापळ्यात अडकवायला सुरुवात केली असाही किशोरी पेडणेकर म्हणाल्या

कुणाच्या हनुमान चालिसा सुरु होत्या कुंच्या थाळ्या वाजत होत्या कुणाचे भोंगे वाजत होते. पण आता भोंगे बंद झाले, थाळ्या बंद झाल्या आणि चाळिसावाली तर डान्समध्ये काम करावं तसं नाचकाम करतेय असं म्हणत किशोरी पेडणेकरांनी विरोधकांवर निशाणा साधला.

महारष्ट्रात लोकांना वाचवण्याचं काम उद्धव ठाकरेंच्या टीम ने केलं आणि ज्याच्यावर विश्वास टाकला त्यानेच विश्वासघात केला, पक्षात फूट पडली, घराला आग लावली, असा म्हणत किशोरी पेडणेकरांनी शिंदेंवर हल्ला चढवलाय. पुढे त्या म्हणाल्या, तुम्ही गेलात तर ठीक आहे पण स्वतःच घर जाळण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्या माथ्यावरचा गद्दारीचा शिक्का कधीच पुसला जाणार नाही.

हे ही वाचा:

शिवसेना विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे दसरा मेळाव्यातून थेट 

शिवसेना उपनेते सुषमा अंधारे शिवतिर्थावरून शिंदे गटावर जोडणे टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version