spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

किशोरी पेडणेकरांनी अमित शहांना दिले उत्तर म्हणाल्या आम्ही तुम्हाल जमिनीवर आणू…

मुंबईकरांना तुमचे धोके आणि खोके देखील नको आहेत

अमित शाह हे त्यांच्या दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत. या दरम्यान ते अनेक सभा आणि मेळावे घेत आहेत. काहीवेळापूर्वीच त्यांनी आगामी मुंबई महानगरपालिकेच्या बाबत चर्चा करण्यासठी २०० पदाधिकाऱ्यांची सभा घेतली होती. अशाच एका सभेत बोलत असताना अमित शाहांनी “राजकारणात सगळं काही सहन करा मात्र धोका सहन करू नका. जे धोका देतात त्यांना योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे. मुंबईतल्या राजकारणावर वर्चस्व केवळ भाजपचं असावं. आता वेळ आली आहे की उद्धव ठाकरेंना जागा दाखवली पाहिजे” म्हणत शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंवर टीका केली होती आणि त्याच्या याच टीकेला मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

अमित शाहांच्या टिकेला प्रत्युत्तर देताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या, “मुंबई महानगरपालिका (Mumbai Municipal Corporation ) निवडणुकीसाठी शिवसेनेने (Siv Sena) प्रथम 150 चा नारा दिला आहे. अमित शाह हे केंद्रीय नेते आहेत, त्यांनी 150 चा नारा देणं म्हणजे आमची कॉपी आहे. शिवाय धोके कोण कोणाला देत आहे हे दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्वजण पाहात आहेत. मुंबईकरांना तुमचे धोके आणि खोके देखील नको आहेत. शिवाय आम्ही पहिल्यापासूनच जमिनीवर आहोत, आम्हाला काय जमीन दाखवणार, तुम्ही आस्मानात आहात ते आम्ही तुम्हाल जमिनीवर आणू, लवकरच भाजपला त्यांची जागा दाखवू.”

मुंबईकरांना दररोजचे प्रश्न सोडवण्यासाठी कोण भेटतं हे महत्वाचं आहे. आमचे शाखाप्रमुख हे मुंबईतील जनतेला प्रथम भेटतात. मुंबईकरांचे प्रश्न शिवसेना समजून घेते. तुमचे मनसुबे आता सर्व राज्यांना आणि सर्व पक्षांना समजले आहे. सर्व पक्षांना संपवायचं आणि आपलं एकट्याचं राज्य आणण्याचा यांचा प्रयत्न आहे, परंतु, जनतेला यांचं खरं रूप माहित झालं आहे, असा हल्लाबोल पेडणेकर यांनी केलाय.

हे ही वाचा:

आता मास्टरकार्ड असणार बीसीसीआयचा नवा टायटल स्पॉन्सर

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या हस्ते ए.एम.नाईक शाळेचा उदघाटन सोहळा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss