spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Kishori Pednekar : १२ आमदारांच्या यादीत तेरावा नंबर कुणाचा?, कदमांच्या टीकेला किशोरी पेडणेकरांचे जशास तसे उत्तर

माजी मंत्री रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष करत नुकतीच त्यांच्यावर एक जहरी टीका केली होती. त्यात कदम यांनी एक सल्लाही विरोधी पक्षनेते अजित पवार यांना दिला होता. त्यात त्यांनी म्हंटले होते की, अजित पवारांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देऊन उद्धव ठाकरे यांना विरोधी पक्षनेते पद द्यावे असं म्हणत कदम यांनी ठाकरेंवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला होता.

यालाच प्रत्युत्तर देतांना किशोरी पेडणेकर यांनीही रामदास कदम यांना सिरीयसली घेण्यात अर्थ नाही असं म्हणत ठाकरे यांच्यावर बोलले की प्रसिद्धी मिळते, त्यामुळे काहीतरी बोलून प्रसिद्धी मिळवायची पण त्यांचा प्रयत्न असाही आहे की, १२ आमदारांच्या यादीत त्यांचे नाव यावे पण त्यांचे नाव तेरावे आहे असं म्हणत पेडणेकर यांनी रामदास कदम यांच्यावर टीका केली आहे. किशोरी पेडणेकर यांनी आमदारकीचा मुद्दा काढून एकप्रकारे कदम यांना डिवचन्याचा प्रयत्न केला असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा : 

Abdul Sattar : कृषिमंत्री अब्दुल सत्तारांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांसोबत केली दिवाळी साजरी

रामदास कदम उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावर सडकून टीका केली ते म्हणाले.”मला आता अंतःकरणापासून वाटतयं, अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यावा अन् उद्धव ठाकरे यांनी हे पद स्वीकारावं,” अशा शब्दात कदमांनी त्यांना टोला हाणला.

“अडीच वर्षात उद्धव ठाकरेंनी एकही महत्त्वाचा निर्णय घेतला नाही. मंत्रालयात येऊन सक्रीय कामगिरीही केली नाही. त्यामुळे माझी एक मागणी आहे. अजित पवार यांनी विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यावा आणि उद्धव ठाकरे यांनी हे पद त्यांच्याकडे घ्यावे,” असा टोला रामदास कदम यांनी लगावला.

मथुरेत देवी लक्ष्मीच्या ऐवजी ‘या’ स्त्री शक्तीची केली जाते पूजा

शिंदे-फडणवीस सरकारच्या दिवाळी कार्यक्रमांवर टीका

दिवाळीनिमित्त अनेकजण अमाप पैसा खर्च करतात आणि दिवाळी पहाट सारखे कार्यक्रम साजरे करत असतात. आम्ही आता किंवा या वर्षापासून नाही, तर मागील अनेक वर्षांपासून याच पद्धतीने दिवाळी उत्सव साजरा करत आलोय. मात्र गेल्या काही दिवसापासून जांबोरी मैदान रडत आहे. तिथली लोक फक्त पाच दिवसातच कंटाळली आहेत, असा टोलाही पेडणेकर यांनी लगावला.

दिवाळीत ध्वनी प्रदुषणाने हृदयविकाराचा झटका येऊ शकतो ; अशी घ्या काळजी

Latest Posts

Don't Miss