spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Ladka Bhau Yojana म्हणजे तरुणांची फसवणूक, Ambadas Danve यांचा सरकारवर आरोप

राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेनंतर आता लाडक्या भावांसाठी देखील एक योजना आणली आहे. मुख्यमंत्र्यांनी नुकतीच ‘लाडका भाऊ’ योजना जाहीर केली. त्यावर आता विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाष्य केले आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची मुंबईतील पत्रकार परिषदेत सध्याच्या सरकारवर टीकास्त्र उगारले. जुन्याचं योजना मुख्यमंत्र्यांच्या नावानं सुरू करुन सरकार जनतेची आणि तरुणांची फसवणूक करत असल्याचे अंबादास दानवे यांनी म्हटले. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली लाडका भाऊ योजना तरुणांची निव्वळ फसवणूक आहे. ही योजना १९७४ पासून महाराष्ट्रात सुरू आहे. सगळ्या योजनांना रोजगार प्रोत्साहन, प्रशिक्षण पहिल्यापासून आहे. या योजने मध्ये नवीन काही नाही. सरकार जनतेची आणि तरुणांची फसवणूक करत आहे. जुन्याचं योजना मुख्यमंत्र्यांच्या नावानं सुरू करून नवीन दाखवत आहेत. तरुण पिढीने या योजनेच्या नावाला फसू नये. निवडणुकीच्या तोंडावर यांना लाडका भाऊ, लाडकी बहीण आठवतंय मात्र प्रत्यक्षात या योजना जुन्या असल्याचे अंबादास दानवे यांनी सांगितले.

काय आहे ही योजना? 

या योजनेअंतर्गत १२ वी पास झालेल्या तरूणांना दरमहा ६ हजार रुपये, डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना ८ हजार रुपये आणि पदवीधर विद्यार्थ्यांना १० हजार स्टायपेंड देण्याची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेद्वारे बेरोजगारीवर उपाय शोधून काढणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे. अर्थसंकल्पात महिलांसाठी ‘लाडकी बहीण’ ही योजना जाहीर करण्यात आली होती. त्याअंतर्गत २१ ते ६० वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा १५०० रुपये दिले जाणार आहेत. बहि‍णींसाठी योजना, मग लाडक्या भावांसाठी काय, असा प्रश्न विरोधकांनी त्यावर उपस्थित केला होता. मात्र आता राज्य सरकारने लाडक्या भावांसाठीदेखील योजना आणली आहे. राज्य सरकार बेरोजगार तरुणांना मोफत प्रशिक्षण किंवा अप्रेंटिसशिप मिळवून देणार आहे. सरकार संबंधित तरुणांना विविध कारखान्यांमधून मोफत प्रशिक्षण मिळवून देईल. हे प्रशिक्षण सहा महिन्यांसाठी असणार आहे. विशेष म्हणजे सरकार या तरुणांना दर महिन्याला ६ हजार ते १० हजार रुपयांपर्यंतचं प्रशिक्षण वेतनही देणार आहे. 

हे ही वाचा:

विशाळगडावरील निष्कासन कारवाईत उच्च न्यायालयाचा अवमान, जितेंद्र आव्हाड यांनी केला पर्दाफाश

Pooja Khedkar IAS पद गमावणार, प्रकरणावर PMO ची बारीक नजर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss