Ashok Chavan : भारत जोडो यात्रेत चव्हाणांचा लेकीचं लाँचिंग; श्रीजयाचे नांदेडमध्ये बॅरन झळकले

Ashok Chavan : भारत जोडो यात्रेत चव्हाणांचा लेकीचं लाँचिंग; श्रीजयाचे नांदेडमध्ये बॅरन झळकले

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणयांच्या कुटुंबातील तिसरी पिढी सक्रीय राजकारणात दिसत आहे. काँग्रेसच्या भारत जोडो अभियानात श्रीजया अशोक चव्हाण या सहभागी झाल्यात. आधी श्रीजया यांचे नांदेडमध्ये बॅरन झळकले होते. काँग्रेसच्या भारत जोडो अभियानाबाबत बॅनवरवर श्रीजया झळकल्यानंतर त्यांच्या राजकीय प्रवेशाची चर्चा सुरु झाली होती.या पार्श्वभूमीवर राहुल गांधींबरोबर भारत जोडो यात्रेतील त्यांचा सहभाग लक्षवेधी ठरला.

दरम्यान आज तिसऱ्या दुवशी सकाळी देखील श्रीजया या राहुल गांधीसोबत भारत जोडो यात्रेत चालत आहेत. त्यामुळे १० नोव्हेंबर रोजी नांदेड येथील राहुल गांधी यांच्या जाहीर सभेत श्रीजया यांची राजकीय भूमिका व आगमन स्पष्ट होईल याची चर्चा जोर धरत आहे. त्यामुळे येत्या काळात एका मोठ्या राजकीय घराण्यातील आणि देशाचे माजी गृहमंत्री ,जलनायक शंकरराव चव्हाण यांची नात ही माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा राजकीय वारस असेल हे मात्र निश्चित आहे.

हेही वाचा : 

शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी करा हे उपाय

श्रीजया चव्हाण या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांची मुलगी आहे. अद्याप त्या राजकारणापासून दूर होत्या. मात्र भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने त्यांचे राजकारणात लाँचिंग झाल्याचे दिसत आहे. भारत जोडो यात्रेच्या पोस्टर्समध्ये श्रीजया चव्हाण यांचा फोटो दिसला होता. त्यानंतर आता त्या राहुल गांधी यांच्यासोबत भारत जोडो यात्रेमध्ये दिसल्या.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांच्या अनपेक्षित पराभवामुळे त्यांच्या समर्थकांसह चव्हाण परिवाराला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत अशोकरावांच्या निवडणुकीत दोन्ही मुलींनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. तीन वर्षांत चव्हाण यांची जनसंपर्क यंत्रणा श्रीजयाने पडद्यामागून लीलया सांभाळली. तसेच अनेक सार्वजनिक कार्यक्रमांच्या नियोजनात भूमिका पार पाडलीय.

लोकसभेच्या पराभवानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी श्रीजया यांनी अशोकरावांच्या प्रचारासाठी पुन्हा कंबर कसली. प्रचारात लक्ष घालत जनसंपर्कापासून साऱ्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. या निवडणुकीत चव्हाणांनी बाजी मारली. आता भारत जोडो यात्रेतून त्या राजकारणात उतरल्या असल्याची चर्चा आहे.

शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी करा हे उपाय

Exit mobile version