Thursday, July 4, 2024

Latest Posts

Laxman Hake Hunger Strike: सर्वपक्षीय शिष्टमंडळ उपोषणकर्त्यांकडे जावे, Sanjay Raut यांचे Maha Govt ला आवाहन

शिवसेना उबाठा पक्षाचे (Shivsena UBT) नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज (शनिवार, २२ जून) पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील मराठा ओबीसी वादावर (Maratha Reservation) (OBC Reservation) मोठे भाष्य केले.

शिवसेना उबाठा पक्षाचे (Shivsena UBT) नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज (शनिवार, २२ जून) पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील मराठा ओबीसी वादावर (Maratha Reservation) (OBC Reservation) मोठे भाष्य करत, “महाराष्ट्र मध्ये आरक्षणावरून जो संघर्ष सुरू आहे,त्यावरून महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय पक्षाना नेत्यांना चर्चेसाठी सामावून घेऊन हा जो राज्यामध्ये संघर्ष सुरू आहे तो थांबवण्याचा दृष्टीने जर राज्य सरकारने (Maharashtra Government) काम केले पाहिजे. शिष्टमंडळ जाऊन उपोषणकर्त्यांकडे (Laxman Hake Hunger Strike) हा प्रश्न सुटणार नाही,” असे वक्तव्य केले.

संजय राऊत यावेळी म्हणाले, “बिहार आरक्षणावरून आता अभ्यास सुरू आहे, बिहारमध्ये ५० % च्या वर वाढीव आरक्षण होते ते कोर्टाने मान्य केले नाही. महाराष्ट्र मध्ये आरक्षणावरून जो संघर्ष सुरू आहे, अनेक मराठा असतील, ओबीसी असतील त्याच्यामुळे आता सरकार काय करताय? सरकार जे म्हणत होतं जे आम्ही टिकाऊ आरक्षण देऊ ते टिकाऊ आरक्षणाची जुळणी कशी करायची? आणि त्यात या महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय पक्षाना नेत्यांना चर्चेसाठी सामावून घेऊन हा जो राज्यामध्ये संघर्ष सुरू आहे तो थांबवण्याचा दृष्टीने जर सरकारला खरोखर इच्छा असेल तर त्यांनी सर्वांशी चर्चा केली पाहिजे. शिष्टमंडळ जाऊन उपोषणकर्त्यांकडे हा प्रश्न सुटणार नाही. कारण कोणत्याही समाजाचा नेता आणि उपोषणकर्ता सरकारवर विश्वास ठेवायला तयार नाही. जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सांगितला आहे माझा सरकारवर विश्वास नाही, लक्ष्मण हाके (Laxman Hake) उपोषणाला बसले आहेत ते देखील बोलत आहेत माझा सरकारवर विश्वास नाही. सरकारवर विश्वास नसेल अशा वेळेला सर्व पक्षीय शिष्टमंडळ किंवा सर्वपक्षीय समिती सर्वपक्षीय चर्चा हाच एक मार्ग आहे.”

ते पुढे म्हणाले, “कोणाचे ताटातले काढून कोणालाही देऊ नये ही शिवसेनेची भूमिका आहे. मागासलेपण सर्व समाजामध्ये आज आहे याला कारण नरेंद्र मोदींची धोरणे आहेत. शेती संदर्भात आर्थिक धोरण, उद्योगासंदर्भातील धोरण, रोजगार संदर्भातली धोरण मोदी सरकार गेल्या दहा वर्षात पूर्णपणे अपयशी ठरल्यामुळे या देशातले सर्व समाज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरले आहेत. महाराष्ट्रामध्ये आपण चित्र पाहत आहोत तसे गुजरात, राजस्थान, हरियाणा प्रत्येक समाजाला आरक्षण हवे आहे. नोकरीमध्ये राखीव जागा हव्या आहेत, शिक्षणामध्ये राखीव जागा हव्या आहेत. याचे कारण नरेंद्र मोदी यांचे अपयशी नेतृत्व आहे. माझ्या माहितीप्रमाणे मनोज जरांगे पाटील यांचे जी भूमिका होती सरकारवर माझा विश्वास नाही तीच भूमिका ओबीसी नेत्यांची दिसत आहे पण तरीही सरकारने प्रयत्न सोडू नयेत. सगळ्यांना सामावून घेऊन शिष्टमंडळ मध्ये उपोषणकर्त्यांशी चर्चा व्हायला हवी.”

हे ही वाचा

Manoj Jarange Patil आणि Chhagan Bhujbal यांच्यात कुणबी नोंदींवरून पुन्हा ‘तु तु मै मै!’

महाविकास आघाडीशी साधली जवळीक; महायुती ने केली कारवाई !

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss