Sunday, July 7, 2024

Latest Posts

Laxman Hake Hunger Strike:ओबीसींचा आवाज…’लक्ष्मण हाके’ आहेत तरी कोण ?

सरकारच्या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर तात्पुरता उपोषणाला स्थगिती दिली आहे. मात्र त्यांच्या संपूर्ण मागण्या पूर्ण होणार का आणि याचा आगामी निवडणुकीत काही फटका बसेल का हे पाहण महत्त्वाचं असेल. 

सध्या आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसत आहे. मराठा विरुद्ध ओबीसी असा नवा वाद आता राज्याच्या राजकारणात उद्भवला आहे. एकीकडे मराठा समाजाच्या हक्कासाठी आणि मराठ्यांच्या न्यायासाठी जालना येथील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचं आमरण उपोषण सुरु आहे तर दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको या मागणीसाठी ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे उपोषणाला बसले आहेत. त्यामुळे लक्ष्मण हाके(Laxman hake) हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत पण ओबीसी आरक्षणासाठी लढणारे लक्ष्मण हाके आहेत तरी कोण आणि त्यांचे राजकीय क्षेत्रात कामगिरी कशी आहे हे आपण पाहुयात.

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील जुजारपूर गावात लक्ष्मण हाके हे रहिवासी आहेत. त्या गावात ‘हाके वस्ती’आहे.त्या वस्तीत लक्ष्मण हाके यांचे आई-वडील आणि नातेवाईक राहतात. मेंढपाळ आणि ऊस तोडणीचं काम करणाऱ्या कुटुंबात लक्ष्मण हाके यांचा जन्म झाला. हाके वस्तीत राहून त्यांनी आपलं १० पर्यंतच शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर ते पुढच्या शिक्षणासाठी पुण्याला गेले. लहानपणापासून कष्ट करुन कमवण्याची सवय असल्याने त्यांनी पुण्यात जाऊन एम.ए पूर्ण केले आणि ते लेक्चरर बनले. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये अध्यापनाचं काम केलं. शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी २००४ पासून आपल्या राजकीय क्षेत्रात पदार्पण करत राजकारणाला सुरुवात केली.

महादेव जानकर (Mahadev Jankar)यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून लक्ष्मण हाके यांनी राजकीय प्रवासाला सुरुवात केली. रासप या पक्षाच्या वाढीत लक्ष्मक हाके यांचा अधिक वाटा आहे. त्यानंतर त्यांनी धनगर आरक्षणासाठी सक्रियपणे सहभाग घेत प्रयत्न केले. २०१४ च्या निवडणुकीत त्यांनी आक्रमकपणे गावोगावी फिरत पक्षाचा प्रचार केला. २०१४ मध्ये सांगोला विधानसभा मतदारसंघात गणपराव देशमुख यांंना पाठिंबा जाहीर केला होता पण २०१९ च्या निवडणुकीत विधानसभा लढवली पण त्या निवडणुकीत अपयशी ठरले. महादेव जानकर यांच्यासोबत काम करत असताना पक्षातील धोरणांना कंटाळून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करत शिवबंधन हाती बांधलं. त्यात काम करत असताना त्यांनी मागासवर्गीय आयोगाचे सदस्य म्हणून काम केले आहे.

शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा होती.पण महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला मिळाली आणि त्यांची इच्छा अपूरी राहिली. त्यामुळे अखेर त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. ओबीसी समाजाच्या प्रश्नावर त्यांनी अनेकवेळा भाष्य आणि आक्रमक भुमिका घेतली आहे. या सगळ्या प्रकरणानंतर ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा सुरु झाल्याने लक्ष्मण हाके(Laxman hake) चर्चेत आले आहेत. लक्ष्मण हाके(Laxman hake) यांनी सरकारकडे प्रामुख्याने मागण्या केल्या आहेत. पहिली मागणी मराठा आरक्षण दिल्यास ओबीसी आरक्षणाला कसा धक्का लागणार नाही याचं लेखी आश्वासन द्यावं ही आहे. तसंच सगेसोयरेच्या मागणीला आणि सरसकट कुणबी प्रमाणपत्र वाटपाला त्यांचा विरोध आहे.या प्रमुख मागण्यांसाठी सलग दहा दिवस त्यांनी जालना जिल्ह्यातील वडीगोद्री मध्ये आमरण उपोषणाचा मार्ग निवडला आहे.

आज सरकारच्या शिष्टमंडळाने वडीगोद्री येथे जाऊन लक्ष्मण हाके(Laxman hake) यांची भेट घेतली. त्यांच्या काही मागण्यावर सरकारने सकारात्मक भुमिका घेतली आहे. सरकारच्या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर तात्पुरता उपोषणाला स्थगिती दिली आहे. मात्र त्यांच्या संपूर्ण मागण्या पूर्ण होणार का आणि याचा आगामी निवडणुकीत काही फटका बसेल का हे पाहण महत्त्वाचं असेल.

हे ही वाचा

सुदृढ नागरिक ही राज्याची संपत्ती, म्हणून…INTERNATIONAL YOGA दिनी CM Shinde यांचे आवाहन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss