मिस्टर संभाजी भोसले तुम्हाला हि रयत राजा मानणार नाही: Laxman Hake

मिस्टर संभाजी भोसले तुम्हाला हि रयत राजा मानणार नाही: Laxman Hake

मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषणाला बसलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचा आमरण उपोषणाचा आज (सोमवार, २३ सप्टेंबर) सातवा दिवस असून संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन जरांगेची भेट घेतली आहे. यावेळी, छत्रपती संभाजीराजे यांनी उपस्थितांशी संवाद साधताना,”इथे जर काही झालं तर त्याला सरकार जबाबदार असणार,” असा पवित्रा घेतला आहे. यावर आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी प्रतिक्रिया दिल्या असून संभाजीराजे छत्रपती यांच्यावर घणाघाती केली आहे.

लक्ष्मण हाके यांनी वडीगोद्री येथे पत्रकारांशी संवाद साधत संभाजीराजे छत्रपती यांच्यावर चांगलीच आगपाखड केली. तसेच, “संभाजीराजे तुम्हाला राजे म्हणायला लाज वाटते. मिस्टर संभाजी भोसले तुम्हाला हि रयत राजा मानणार नाही,” असे वक्तव्य त्यांनी केले. त्यामुळे आरक्षणावरून निर्माण झालेला मराठा – ओबीसी वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

काय म्हणाले लक्ष्मण हाके?

वडीगोद्री येथे माध्यमांशी संवाद साधताना लक्ष्मण हाके म्हणाले, “संभाजीराजे छत्रपती यांना शोषितांचा कळवळा नाही. मनोज जरांगे यांचे आंदोलन राजकारणासाठीच करण्यात आले होते. मराठवाड्यातल्या बारा बलुतेदारांच्या दुकानावर हल्ले झाले. नाभिक समाजाच्या लोकांच्या दुकानांवरती हल्ले झाले. हे कशात बसते? संभाजीराजे तुम्हाला राजे म्हणायला लाज वाटते. तुम्ही छत्रपती शाहू महाराजांचे आणि शिवरायांचेदेखील वारस नाहीत. मिस्टर संभाजी भोसले हि रयत तुम्हाला राजा मानणार नाही,” असे ते म्हणाले.

“छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्य निर्माण होण्यासाठी अठरापगड जातींनी जीवाची कुर्बानी दिली. संभाजी भोसले आता मी तुम्हाला राजा मानणार नाही. आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांच्या विचाराचे आम्ही पाईक आहोत. मिस्टर संभाजी भोसले विशाळगडावरती माझया मुस्लिम मातामाउली रडत होत्या तेव्हा तुम्ही हात वर करून चिथावणी देत होता. त्या जरांगेंनी त्याच्या बॅनरवरती छत्रपती शाहू महाराजांची प्रतिमा वापरली आहे का? आम्ही एका जातीच्या आरक्षणाची मागणी करत नाही,” असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचा तिसरा हप्ता मिळणार कधी? Aditi Tatkare यांनी दिलं उत्तर

Devendra Fadnavis on Koli Bhavan: आपले सरकार कोळी बांधवाच्या बाजूने खंबीरपणे उभे, Devendra Fadnavis यांचे प्रतिपादन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version