नेते एकनाथ शिंदेनी आमदारांसहित कामाख्या देवीचे दर्शन घेतले.

नेते एकनाथ शिंदे म्हणाले. एकनाथ शिंदे उद्या आमदारांसहित मुंबईत परतणार असून त्याआधी त्यांनी देवीचं दर्शन घेतलं.

नेते एकनाथ शिंदेनी आमदारांसहित कामाख्या देवीचे दर्शन घेतले.

शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे बंडखोरी करून मागील एक आठवड्यापासून ४० हून अधिक शिवसेना आणि अपक्ष आमदारांना घेऊन आसाममधील गुवाहाटी याठिकाणी वास्तव्यास आहेत. आज सर्व आमदारांनी माँ कामाख्या देवीचे दर्शन घेतले. इथे कोणत्याही आमदाराला जबरदस्तीने आणलेले नाही सर्व स्वेच्छेने आले आहेत असं पुन्हा एकदा नेते एकनाथ शिंदे म्हणाले. एकनाथ शिंदे उद्या आमदारांसहित मुंबईत परतणार असून त्याआधी त्यांनी देवीचं दर्शन घेतलं. मुंबईत परतल्यावर आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट देणार असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.

माँ कामाख्या देवीचे दर्शन घेतल्यावर मंदिरातून बाहेर पडताना नेते एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांसोबत संवाद देखील साधला. जे म्हणत होते की इथे आमदारांना जबरदस्ती आणलं आहे, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिला का ? कुणी ही मनाविरुद्ध इथे आल्याचं दिसतंय का ? सर्वजण मोकळेपणाने फिरत होते. आमच्याकडे 40 आधिक 10 असे 50 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यामुळे आम्हाला बहुमत चाचणीची काळजी नाही. उद्या सकाळी सर्व आमदार मुंबईत पोहोचतील. आमच्याकडे संख्याबळ जास्त आहे, त्यामुळे आम्ही मेजॉरिटीमध्ये आहोत. असं एकनाथ शिंदे म्हणाले.

भाजपानं पहिल्यांदाच या सगळ्या वादामध्ये उडी घेत थेट राज्यपालांची भेट घेत राज्य सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देण्याची विनंती केली. त्याम रुंगात असलेले महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फ्लोर टेस्टमध्ये मतदानाचा हक्क मागण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयात या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

Exit mobile version