राज्यपालांना तीन वर्षांनंतरही महाराष्ट्र कळत नसेल तर राज्यपालपदी राहण्याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ… ; अजित पवार

राज्यपालांना तीन वर्षांनंतरही महाराष्ट्र कळत नसेल तर राज्यपालपदी राहण्याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ… ; अजित पवार

काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे महाराष्ट्रासह अवघ्या देशात वाद निर्माण झाला. याच्या विरोधात भाजपनेही राज्यभर आंदोलन केलं. हे प्रकरण अद्याप ताजे असतानाच आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबतच्या केलेल्या एका विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय. यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यपालांविषयी प्रतिक्रिया दिली आहे. पवार म्हणाले, ‘महाराष्ट्राच्या राज्यपालपदी तीन वर्षांहून अधिक काळ राहूनही राज्यपालमहोदयांना छत्रपती शिवाजी महाराज समजत नसतील, महाराष्ट्र व महाराष्ट्राची लोकभावना कळत नसेल, तर राज्यपाल महोदयांनी पदावर राहण्याबाबत गांभीर्याने पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे.’ अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.

हेही वाचा : 

पॉर्नोग्राफी प्रकरणी मुंबई पोलिसांकडून राज कुंद्राविरोधात पुरवणी आरोपपत्र महानगर दंडाधिकारी कोर्टात दाखल

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जगातील सर्वकालिन, सर्वश्रेष्ठ आदर्श राजेआहेत. राजसत्तेचा उपयोग विलासासाठी नव्हे तर लोककल्याणासाठी कसा करता येतो, याचा आदर्श त्यांनी निर्माण केला. छत्रपती शिवरायांना आदर्श मानून महाराष्ट्र आजवर घडला, यापुढेही घडत राहील राज्यपाल महोदयांच्या अनावश्यक, अनाकलनीय, निंदनीय वक्तव्यांची, पंतप्रधान महोदयांनी गांभीर्याने दखल घेण्याची वेळ आली आहे. राज्यपाल महोदयांना सद्‌बुद्धी लाभो, अशी प्रार्थनाही अजित पवार यांनी केली.

BJP : राज्यपालांच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर अखेर भाजपनं दिली प्रतिक्रिया

पुन्हा एकदा दळभद्री वक्तव्य : संजय राऊत

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले की, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा एकदा दळभद्री वक्तव्य केलं आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राचा अपमान केला आहे. महाराष्ट्राचा स्वाभिमान दुखावला आहे. त्यातच भाजप प्रवक्ता सुधांशू त्रिवेदी यांनी देखील वादग्रस्त विधान केले आहे. औरंगजेबाची माफी शिवाजी महाराजांनी मागितली असं विधान भाजपच्या प्रवकत्यांनी केलंय, हे भाजपला मान्य आहे का? असा सवाल राऊत यांनी केला आहे.

Viral Video : नाव ‘दत्ता’ अधिकाऱ्यांने रेशन कार्डवर लिहलं ‘कुत्ता’ ; पीडित तरुणाने कुत्रा बनून अधिकाऱ्याला शिकवला धडा

Exit mobile version