spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राज्यातील सत्ता संघर्षाच्या निकाला आधीच उद्धव ठाकरे यांना आणखीन एक धक्का

शिवसेना कुणाची? धनुष्यबाण हे चिन्हं कुणाचं? अपात्र आमदारांचं काय होणार? आणि शिंदे-फडणवीस सरकारचं काय होणार? अद्यापही यासंदर्भात निकाला लागलेलं नाही. महाराष्ट्रात ‘महाविकास आघाडी’ बरखास्त करून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी नवे सरकार स्थापन केलं. नवे सरकार स्थापन झाल्यानंतर खरी शिवसेना कोणाची हा प्रश्न राज्यकार्त्यांसह जनतेला पडला आहे. शिवसेना आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण कोणाचा याचा निर्णय निवडणूक आयोगासमोर होणार आहे. परंतु निवडणूक आयोगाचा निकाल समोर येण्या पूर्वीच उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्रातील नेत्यांपाठोपाठ आता इतर राज्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाला पाठिंबा दर्शवला आहे. यामुळे नक्कीच उद्धव ठाकरे याची डोके दुखी वाढणार आहे.

हेही वाचा : 

बच्चू कडूंना दिलासा, जामीन झाला मंजूर

काल १४ सप्टेंबर मंगळवारी शिंदे गटाची बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्राबाहेरील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला. यामध्ये जवळपास ८ राज्यांच्या प्रमुखांनी शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. तर यामध्ये दिल्ली, मध्यप्रदेश, छत्तीसगड, मणिपूर, गोवा, बिहार आदी राज्यांचे प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. या राज्यांमध्ये शिवसेना मागील काही वर्षांपासून पक्ष विस्तारासाठी प्रयत्नशील आहे.

एमसीए निवडणुकीत शरद पवार यांचा संदीप पाटील, राजू कुलकर्णी यांना आशीर्वाद

शिवसेनेचे निवडणूक चिन्हं धनुष्यबाण आपल्याला द्यावे अशी मागणीदेखील एकनाथ शिंदे यांनी केली आहे. तर, दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पूर्ण झाल्याशिवाय निवडणूक आयोगाने सुनावणी न घेण्याची मागणी केली आहे. सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटावर अपात्रतेची कारवाई करावी यासह इतर मुद्यांवर सुनावणी सुरू आहे. शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयासमोर निवडणूक आयोगाला सुनावणी घेण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे. यावर सुप्रीम कोर्टात २९ सप्टेंबर २०२२ रोजी सुनावणी होणार आहे.

पुन्हा एकदा शिंदे व ठाकरे आमने सामने

दसरा मेळाव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा एकदा आमने सामने आले आहेत. शिवाजी पार्क अर्थात शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे आणि शिंदे गट यांच्यात चढाओढ सुरु आहे. अशातच शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर होणार असल्याची माहिती समोर येत होती. मात्र, हा दसरा दसरा मेळावा शिवतीर्थावरच व्हायला हवा अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी मांडली आहे. यामुळे शिवाजी पार्कवरच शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सांगलीत मनपा स्थायी सभापतीपदी निवडणुकीत भाजपचा विजय तर, काँग्रेसच्या पदरी अपयश

Latest Posts

Don't Miss