spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

कर्नाटक- महाराष्ट्र सीमाप्रश्न सोडवण्यासाठी संयमी मार्गाने पुढं जाऊ- शंभुराज देसाई

"बेळगाव दौरा अद्याप रद्द केलेला नाही. या दौऱ्याबाबत कर्नाटक सरकारला कळवलं आहे. या दौऱ्याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील," असं स्पष्टीकरण शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी दिलं आहे.

“बेळगाव दौरा अद्याप रद्द केलेला नाही. या दौऱ्याबाबत कर्नाटक सरकारला कळवलं आहे. या दौऱ्याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील,” असं स्पष्टीकरण शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी दिलं आहे. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत शंभूराज देसाई यांनी बेळगाव (Belgaon) दौऱ्यावरुन सुरु असलेल्या चर्चांबाबत भाष्य केलं.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी महाराष्ट्राच्या जत, अक्कलकोट, सोलापूर अशा भागांवर दावा ठोकल्यानंतर महाराष्ट्र-कर्नाटकमध्ये शाब्दिक युद्ध सुरु झालं आहे. या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर सीमाभागातील बेळगावात होऊ घातलेला महाराष्ट्रातील मंत्र्यांचा दौरा रद्द होणार का? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई हे बेळगाव दौऱ्यावर जाणार आहे. मात्र सीमावाद चिघळू नये यासाठी मंत्र्यांना बेळगावात न पाठवण्याची विनंती कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी केली होती. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनीही शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील यांना बेळगावला न जाण्याच्या सूचना दिल्याचं चर्चा होती. त्यातच या दोघांचा दौरा रद्द होणार असल्याचं म्हटलं जात आहे. तत्पूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. तिथेच ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी सीमाप्रश्नाबाबत चर्चा करण्याची शक्यता आहे.

६ तारखेला महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी बेळगावातील मराठी बांधवांनी कार्यक्रम आयोजित केला आहे. त्या कार्यक्रमासाठी आम्ही आमचा दौरा सहा तारखेला निश्चित केलेला आहे. आम्ही येणार आहोत हे कर्नाटक सरकारला कळवलं आहे. सविस्तर दौरा कळवलेला नाही. या घटकेला आम्ही दौरा रद्द केल्याबाबत अधिकृत कळवलेलं नाही. याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यांसोबत चर्चा करुन ते जो आदेश देतील त्यानुसार निर्णय घेऊ, असं शंभूराज देसाई म्हणाले.

आपले मंत्री घाबरले आहेत, असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला होता. त्या आरोपांनी उत्तर देताना शंभूराज देसाई म्हणाले की, “मंत्री बिलकुल घाबरत नाही. आम्हाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आदेश दिला तर कोणत्याही परिस्थितीत जाऊ शकतो. पण आम्हाला सामंजस्याची भूमिका घ्यायची आहे. समन्वयातून यामधून तोडगा काढायचा आहे. हे प्रकरण चिघळू न देता, केंद्राने याच मध्यस्थी करावी आणि समन्वयातून दोन्ही राज्यांमधील हा प्रश्न सोडवावा ही आमची भूमिका आहे. आततायीपणा करुन, कायदा हातात घेऊन आम्हाला हे प्रकरण चिघळवायचं नाही. मराठी भाषिकांना न्याय मिळाला पाहिजे, तिथल्या नागरिकांची जी भावना आहे, त्या भावनेच्या पाठिशी आम्ही आहोत.”

हे ही वाचा : 

‘सामना’तील रोखठोक सदरातून संजय राऊतांनी सोडले टीकास्त्र, ४० आमदारांनी महाराष्ट्राच्या भूमीशी सरळ बेइमानी केली

World Soil Day 2022 ‘जागतिक मृदा दिन’ ५ डिसेंबर रोजी साजरा केला जातो, जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss