spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

LIVE राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेसची पत्रकार परिषद

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केलेल्या वक्तव्यावर त्यांना २ वर्षाची शिक्षा झाल्यावर आणि त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयाने मोठी कारवाई केली आहे.

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केलेल्या वक्तव्यावर त्यांना २ वर्षाची शिक्षा झाल्यावर आणि त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयाने मोठी कारवाई केली आहे. काँग्रेसचे जेष्ठ नेते पत्रकार अभिषेक सिंघवी (Abhishek Singhvi) म्हणाले की, हि कारवाई आधी राजकीय पद्धतीने केली आणि मग कायद्याने करण्यात आली आहे हा लोकशाहीवर घाला आहे. ते म्हणाले की राहुल गांधी हे अनेक विषयांवर बिनधास्त बोलत आहेत आणि कोणालाही घाबरत नाहीत. परदेशामधील राहूल गांधींची विधाने देशविरोधामध्ये नाहीत असे अभिषेक सिंघवी म्हणाले.

पुढे अभिषेक सिंघवी म्हणाले की, देशामधील ज्वलंत प्रश्नांवरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आणि राहुल गांधींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. ५ वाजता काँग्रेसची महत्वपूर्ण बैठक होणार आहे या बैठकीमध्ये काँग्रेसची पुढील रणनीती आखली जाणार आहे. सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये प्रश्न उपस्थित करणाऱ्यावर कारवाई केली जात आहे. पक्षाचा चेहरा असणाऱ्या नेत्यांची खासदारकी रद्द केली जात आहे. राहुल गांधी यांच्या रद्द झालेल्या खासदारकी मुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

राहुल गांधींसमोरील पर्याय

वरच्या कोर्टाने जर राहुल गांधींना निर्दोष ठरवल तरच खासदारकी पुन्हा मिळू शकते परंतु यांची केवळ शिक्षा रद्द करून चालणार नाही तर ते दोषमुक्त असल्याचा निकाल हवा आहे. यासाठी तिसऱ्या व्यक्तीने हायकोर्टामध्ये किंवा सर्वाच्च न्यायालयात याचिका दाखल करायला हवी. राहुल गांधी यांनी जर व्यक्तींसह जर याचिका केली तर ती चालणार नाही.

हे ही वाचा : 

RAJ THACKERAY SPEECH LIVE, उद्धव जिथं सभा घेतात तिथं सभा घेत बसू नका, राज ठाकरेंचा शिंदेंना कानमंत्र

जर राज ठाकरे जनतेच्या मनात मुख्यमंत्री आहेत तर मग मी जनतेच्या मनात भारताचा पंतप्रधान, जितेंद्र आव्हाड

Gudi Padwa Special गुढीची साडी व मिरवणुकीसाठी फेटे | Dadar Shopping Market

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss