सुभाष देसाई दसरा मेळाव्यातून थेट…

जहाजे तोडण्याचा कारखाना महाराष्ट्राला मिळाला तोही गुजरातात गेला. पालघर मधील सागरी पोलीस अकादमी रद्द करून गुजरातला गेलं . एअर इंडियाचं मुख्य ऑफीसा सुद्धा दिल्लीला गेलं हे मुंबईला कंगाल बनवण्याचं कारस्थान आहे.

सुभाष देसाई दसरा मेळाव्यातून थेट…

गदारी करून जर कुणी फिरतं असेल तर शिवसैनिक व सामान्य मानस सुद्धा संतप्त होणाराचं - शिवसेना नेते सुभाष देसाई

सुभाष देसाईंनी भाषणाची सुरुवातच शिंदेगटाच्या नेत्यांना कावळे म्हणत केली. ते म्हणाले,हे जमलेले ते मावळे आणि उडालेले ते कावळे. भाजपने काकवळ ठेवलीय तोपर्यंत हे कावळे शीत टिपतायत ज्या वेळेला भाजपा शीत टाकणं बंद करेल तेव्हा कावकाव करत जातील. पण मावळे मात्र शेवटपर्यंत ठामपणे राहतील. उद्धव ठाकरेंनी मुखयमंत्री पद मराठी माणसांना अभिमान वाटावा असा सांभाळ असतानाही त्यांना दगा देणाऱ्यांची कीव करावी तितकी कमी असेही सुभाष देसाई पुढे म्हणाले.

मराठी भाषेबद्दलची हालहाल व्यक्त करत ते म्हणले, उद्धवसाहेबांनी माझ्याकडे मराठी भाषेची सेवा करण्याचे काम दिले. आज मराठी भाषा प्रेमी आणि तज्ज्ञ संस्था यांची सगळी मंडळी चिंतेत आहेत. दोन अडीच वर्षात उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही अनेक निर्णय घेतले. मराठी भाषा भावनाच काम सुरु केलं, मराठीत शिक्षण अनिवार्य केलं. दुकानाच्या पाट्या मराठी असाव्यात म्हणून कायदा केला. पण आज सरकारमध्ये बसलेल्यांना मराठी भाषेबद्दल उदासीनता आलीय mpsc आणि सरकारी शाळांमधले परीक्षांचे पेपर हिंदी आणि इंग्रजीत केले जातायत. मराठीला वर्गाच्या बाहेर ठेवलाय उद्धव ठाकरे असते तर हि कुणाची हिम्मत झाली नसती. त्यामुळे हे कुडमुडे सरकार बाहेर काढून आपल्याला आपलं सरकार आणावं लागेल

भाजपचे देवेंद्र फडणवीस आले नागपुरातून आणि मुंबई महानगर पालिकेतील शिवसेनेच्या चौकीशीची धमकी देतायत मुंबईत चांगल्या सुविधा येतायत त्यामुळे हि धमकी दिली जातेय. नागपूरमध्ये आपली बस नावाचा प्रक्लप केला आणि खाजगी ठेकेदाराला बस चालवायला दिली आज त्यांना १०० कोटी देण्याचा घाट घेतला जातोय आणि याची चौकशी करणार का फडणवीस?, असा सवाल सुभाष देसाईंनी केला. तसेच नागपुरातील ५०० कोटींची थकबाकी आहे. ती केली जात नाहीये कारण त्यांचे भाजपशी लागेबांधे आहेत. ocw कंपनीने नागपूरला २४ पाणी देण्यासाठी भाजप नेत्याने या कंपनीला नेमले आणि हि कंपनी आता त्यांच्याकडे ८० कोटी मागतेय. हि ocw कंपनी कुणाची याची चौकशी करा. मुंबई महानगरपालिकेची चौकशी करून खोदेगा पहाड निकलेगा चुहा होतीच लागणार आहे. असही सुभाष देसाई म्हणले

मुंबई वर कब्जा मिळवण्याचा भाजपचा मनसुबा आहे तो फार धोकादायक आहे.मुंबईतून सगळं काही पळवण्याच काम सुरूय . आंतराष्त्री वित्तीय केंद्र मुंबईला मिळायला हवं होत पण ते अहमदाबादला गेलं. राष्ट्रीय कामगार शिक्षण संस्थसुद्धा गुजरातला गेला. जहाजे तोडण्याचा कारखाना महाराष्ट्राला मिळाला तोही गुजरातात गेला. पालघर मधील सागरी पोलीस अकादमी रद्द करून गुजरातला गेलं . एअर इंडियाचं मुख्य ऑफीसा सुद्धा दिल्लीला गेलं हे मुंबईला कंगाल बनवण्याचं कारस्थान आहे. फॉक्सकॉन प्रकल्प सुद्धा आता ,महाराष्ट्राबाहेर गेला असाच सगळं झाला तर डोक्याला हाथ लावायची पाळी येईल. असा सुभाष देसाई फॉक्सकॉन प्रक्लबबद्दल बोलताना म्हणले

हे ही वाचा

शिवसेना उपनेते सुषमा अंधारे शिवतिर्थावरून शिंदे गटावर जोडणे टीका

किशोरी पेडणेकर दसरा मेळाव्यातून थेट..

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Exit mobile version