Lok Sabha २०२४ – राज्या-राज्यातील जागांचे गणित काय?

तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठीच्या  तयारीला आणखी वेग दिला आहे.

Lok Sabha  २०२४ – राज्या-राज्यातील जागांचे गणित काय?

तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठीच्या  तयारीला आणखी वेग दिला आहे. त्यादृष्टीने संघटनात्मक पातळीवर काम सुरू असून दुसरीकडे केंद्र सरकारदेखील आगामी काही दिवसात लोकप्रिय घोषणा करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपकडून आता 400 हून अधिक जागा जिंकण्याचा प्रयत्न सुरू आहे. हिंदी भाषिक पट्ट्यात भाजपकडे सर्वाधिक लोकसभेच्या जागा आहेत. त्यामुळे आता ही कामगिरी पुन्हा एकदा करण्याची तयारी भाजपने केली आहे. त्याशिवाय, ‘मिशन 400’ गाठण्यासाठी भाजपला देशभरातील सर्व राज्यांमध्ये जागा जिंकाव्या लागणार आहेत.

हिंदी भाषिक राज्यांमध्ये भाजपचे वर्चस्व
लोकसभा निवडणुकीला जवळपास पाच महिने उरले आहेत. तीन राज्यांमध्ये लोकसभेच्या 65 जागा भाजपने जिंकल्या आहेत, त्यापैकी सध्या भाजपकडे 61 जागा आहेत. बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, दिल्ली, झारखंड, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या हिंदी भाषिक राज्यांमध्ये 193 जागा आहेत. या राज्यांतील 177 जागांवर भाजपचे खासदार आहेत.

भाजपसमोर या राज्यांतील आपल्या जागा टिकवून ठेवण्याचेच नव्हे तर संख्याबळ वाढवण्याचे आव्हान आहे. 11 राज्यांमध्ये जागा वाढण्यास फारसा वाव नाही. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये भाजप सर्वाधिक जागा जिंकू शकेल असे गृहित धरले तरी पूर्ण बहुमत मिळवण्यासाठी पश्चिम बंगाल, आसाम, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये 2019 च्या कामगिरीची पुनरावृत्ती करावी लागेल. 2019 च्या निवडणुकीत भाजपने बंगालमध्ये 18 जागा, महाराष्ट्रात 23 जागा आणि गुजरातमध्ये सर्व 26 जागा जिंकल्या. बंगाल, महाराष्ट्रात चांगल्या कामगिरीसाठी भाजपला जोर लावावा लागणार आहे.

‘मिशन 400’ ची वाट अधिक बिकट
मागील दोन लोकसभा निवडणुकीत भाजप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर मैदानात उतरली. त्याच्या परिणामी भाजपला पूर्ण बहुमत मिळाले. मात्र, मोदी लाट असतानादेखील भाजपला काही राज्यांमध्ये खाते उघडा आले नाही. भाजपने काश्मीर ते बिहार या उत्तर भारतातील सर्व जागा जिंकल्या तरी त्यांना 245 जागा मिळतील. मात्र, एवढं निर्भेळ यश मिळवणे भारतीय राजकारणात कठीण आहे. त्याशिवाय भाजपला 400 जागा मिळवण्यासाठी केरळ, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यांमध्येदेखील प्रत्येकी किमान 10 जागांवर विजय मिळवावा लागणार आहे. ही बाबदेखील आव्हानात्मक आहे. या राज्यांतील एकूण 118 जागांपैकी भाजपकडे फक्त चार जागा आहेत, ज्या तेलंगणात जिंकल्या होत्या.

हे ही वाचा:

CID चे इंस्पेक्टर फ्रेड्रिक्स म्हणजेच दिनेश फडणीस यांनी वयाच्या ६३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Pankaja Munde – Devendra Fadnavis एकत्र येणार एकाच व्यासपीठावर ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version